शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - नागरिकांनी घरात बसावे म्हणून महापौर उतरल्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 18:22 IST

राज्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता संचारबंदी लागू झाली आहे. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. परंतु कोल्हापूर शहरात अजूनही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर निलोफर आजरेकर स्वत: रस्त्यावर उतरून भाजी मंडई व व्यापार पेठेत जाऊन नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देनागरिकांनी घरात बसावे म्हणून महापौर उतरल्या रस्त्यावरफिरून सर्व नागरिकांना घरीच बसण्याचे केले आवाहन

कोल्हापूर : राज्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता संचारबंदी लागू झाली आहे. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. परंतु कोल्हापूर शहरात अजूनही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर निलोफर आजरेकर स्वत: रस्त्यावर उतरून भाजी मंडई व व्यापार पेठेत जाऊन नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन केले.मंगळवारी सकाळी त्यांनी शाहूपुरी व्यापार पेठ, लक्ष्मीपुरी भाजी मंडई, महाद्वार रोड, कपिलतीर्थ मार्केट, शिंगोशी मार्केट, पाडळकर मार्केट, कुंभार गल्ली भाजी मंडई, बाजार गेट, पानलाईन, मटण मार्केट, शिवाजी चौक याठिकाणी फिरती करून सर्व नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन केले.नागरिकांनी गर्दी करू नये, प्रत्येक भाजी विक्रेत्याने अंतर ठेवावे, दुकानदारांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, इतरांना बाहेर ठरावीक अंतरावर उभे करावे, असे आवाहन महापौरांनी केले. तसेच जे बाहेर गावावरून कोल्हापुरात आलेले आहेत व ज्यांच्यावर होम कोरोनटाईन असा शिक्का मारलेला आहे. त्यांनी घरामध्येच बसावे बाहेर फिरू नये. आपण जर बाहेर फिरताना आढळल्यास आपल्याला स्वतंत्र अलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाईल, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी अग्निशमन विभागाचे पथक त्यांच्याबरोबर होते. यावेळी उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी दस्तीगीर मुल्ला, मनीष रणभिसे, आश्पाक आजरेकर, अग्निशमन व मार्केट विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौरkolhapurकोल्हापूर