शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

corona virus -लॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच एस.टी. वाहतूक शंभर टक्के बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 2:11 PM

शासनाचे प्रतीक म्हणून कोणतेही आंदोलन पेटले तरी त्याचे पहिले टार्गेट हे एस.टी.च असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व एस.टी.ची होणारी तोडफोड रोखण्यासाठी कोल्हापूर विभागात दहा वर्षांत विविध आंदोलनामुळे २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे पहिल्यांदाच एस.टी. वाहतूक शंभर टक्के बंदआंदोलनामुळे दहा वर्षांत २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद

प्रदीप शिंदेकोल्हापूर : शासनाचे प्रतीक म्हणून कोणतेही आंदोलन पेटले तरी त्याचे पहिले टार्गेट हे एस.टी.च असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व एस.टी.ची होणारी तोडफोड रोखण्यासाठी कोल्हापूर विभागात दहा वर्षांत विविध आंदोलनामुळे २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद झाली आहे.कोणतेही आंदोलन हिंसक झाले तर सरकारला जाग आणण्यासाठी एस.टी.बस गाडीची तोडफोड केली जाते. खासगी वाहनांची तोडफोड करून शासन तितके गांभीर्याने दखल घेत नसल्याने आंदोलनकर्ते नेहमी एस. टी. बसेसना टारगेट करतात.

आंदोलनामुळे काहीवेळा बसेस जाळण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आंदोलनामुळे अनेक गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.प्रवाशांच्या हितासाठी चोवीस तास एस.टी. बस रस्त्यांवर असते, त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी आंदोलकांनी एस. टी. बसेसना टारगेट करू नये, अशी विनंती वारंवार महामंडळाच्यावतीने केले जाते, त्याकडे कोणी गांभीर्याने पाहात नाही, असे चित्र पहाण्यास मिळते.नैसर्गिक आपत्तीपुढे हतबलकोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात प्रथमच पुरामुळे ५ ते ११ आॅगस्ट दरम्यान सात दिवस वाहतूक शंभर टक्के बंद होती. कोरोना विषाणू रोखण्यासाठी प्रथमच लॉकडाऊनमुळे एस.टी. वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.या कारणास्तव कोल्हापूर विभागातील वाहतूक बंद

  •  भारत बंद आंदोलनामुळे (५ जुलै २०१०)
  •  पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी पुकारलेला बंद (३१ मे २०१२)
  •  शेतकरी संघटना ऊस दराबाबत ‘रस्ता बंद’ आंदोलन (११ व १२ नोव्हेंबर २०१२)
  •  टोल बंद आंदोलन (२१ जानेवारी २०१३)
  • टोल आंदोलन (१७ आॅक्टोबर २०१३)
  • गतवर्षीच्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाच्या धास्तीने (२८ नोव्हेंबर २०१३)
  •  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकुराचा पडसाद (६ आॅगस्ट २०१४)
  •  गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद - (२२ फेब्रुवारी २०१५)
  • बहुजन क्रांती मोर्चा (१४ डिसेंबर २०१६)
  •  एस.टी. वर्कर्स काँग्रेस संप (इंटक)
  • महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती संप - १७, १८, १९ आॅक्टोबर २०१७
  •  भीमा कोरेगाव (१ जानेवारी २०१८)
  •  दूध दरवाढ आंदोलन (१७ ते २० जुलै २०१८)
  • राज्य परिवहन कर्मचारयांच्या संपामुळे बंद (८ व ९ नोव्हेंबर २०१८)
  • मराठा क्रांती महाराष्ट्र बंद (२४ जुलै २०१८)
  • मराठा क्रांती ठोक मोर्चा (९ आॅगस्ट २०१८)

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीkolhapurकोल्हापूर