शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

corona virus : मुंबई, केरळनंतर कागलचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 11:44 AM

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात मुंबई, केरळच्या धर्तीवर राबवलेला कोरोना मुक्तीचा पॅटर्न दिशादर्शक ठरणार आहे. गंभीर परिस्थितीपूर्वीच घरोघरी स्क्रीनिंग करून त्यावर तत्काळ उपचार होणार असल्याने कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी निश्चितच उपयुक्त आहे.

ठळक मुद्देघरोघरी केले जाणार स्क्रीनिंग गंभीर परिस्थितीपूर्वीच होणार उपचार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात मुंबई, केरळच्या धर्तीवर राबवलेला कोरोना मुक्तीचा पॅटर्न दिशादर्शक ठरणार आहे. गंभीर परिस्थितीपूर्वीच घरोघरी स्क्रीनिंग करून त्यावर तत्काळ उपचार होणार असल्याने कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी निश्चितच उपयुक्त आहे.केरळ, दिल्ली व मुंबई मध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला होता. तिथे आरोग्य विभागाने ज्या पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आणली, त्याच पद्धतीने कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री हसन मुश्रीफ यांनी घरोघरी स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मतदारसंघांतील १२६ ग्रामपंचायतींकडे ऑक्सिमीटर्स व थर्मल स्कॅनर मशिन्स दिले आहेत.

ग्रामदक्षता समित्या, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषी, शिक्षण, आरोग्य विभाग, अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून एक दिवसाच्या बालकापासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे.

दर पंधरवड्याला प्रत्येक नागरिकाचे स्क्रीनिंग होणार असल्याने गंभीर परिस्थितीपूर्वीच उपचार होणार आहे. तपासणीमध्ये नियमांपेक्षा वेगळी लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू होणार आहेत. त्यामुळे पुढे लक्षणे वाढवण्यापूर्वीच त्याला आळा घालण्यात यश येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, सेवाभावी व सामाजिक संघटनांनी अशा प्रकारे व्यापक मोहीम राबविली तर जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.कसे असावे प्रमाण :

  • ऑक्सीमीटर्स (रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण) - नियमित (योग्य) : ९५ युनिट. ९४ युनिटपेक्षा कमी असल्यास धोकादायक.
  • फारनेट (अंगातील तापमानाचे प्रमाण ) - नियमित (योग्य) : ९८ अंश सेल्सिअस. १०० अंश सेल्सिअस झाल्यास धोकादायक.

कागल मतदारसंघात असे झाले वाटप :कागल व गडहिंग्लज शहर प्रत्येकी (२०० ऑक्सिमीटर व २०० थर्मल स्कॅनर), कागल तालुका ग्रामीण भाग (२५० ऑक्सिमीटर व २५० थर्मल स्कॅनर). कडगाव कौलगे व उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातही दिली जाणार आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर