शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

corona virus : मोठा दिलासा : नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:11 IST

कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूरकरांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात नवीन ५३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असले तरी त्याही पेक्षा जास्त म्हणजे ६९० रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवारी देखिल नव्याने दाखल होणाऱ्या ५८२ रुग्णांपेक्षा ६९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले

ठळक मुद्देमोठा दिलासा : नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढले१५ जणांचा मृत्यू : तपासणी अहवालही आता झटपट

 कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूरकरांना सोमवारी मोठा दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात नवीन ५३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असले तरी त्याही पेक्षा जास्त म्हणजे ६९० रुग्ण बरे होऊन घरी परतले. रविवारी देखिल नव्याने दाखल होणाऱ्या ५८२ रुग्णांपेक्षा ६९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

गेल्या अनेक दिवसात प्रथमच असे चित्र पहायला मिळाले. याचाच अर्थ गेल्या दोन दिवसापासून नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.दरम्यान, सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये दहा पुरुष तर पाच महिलांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील रविववार पेठ, शुक्रवारपेठ, नागाळा पार्क व वर्षानगर या ठिकाणी राहणाऱ्या चौघांचा मृत्यू झाला.

त्याखालोखाल इचलकरंजी शहरातील तीनबत्ती चौक, कारंडेमळा व शहापूर रोड याठिकाणच्या तिघांचा, करवीर तालुक्यातील उचगांव, कळंबे तर्फ ठाणे, पाचगांव येथील तिघांचा मृत्यू झाला. शिरोळचे दोन, हातकणंगले तालुक्यातील कोरोची व रेंदाळ येथील दोन तर शाहुवाडी तालुक्यातील उचत येथील एकाचा मृत्यू झालेल्यामध्ये समावेश आहे.कोल्हापूरकरांकरिता रविवार व सोमवार हे दोन दिवस थोडासा आधार देणारे ठरले. रविवारी ५८२ रुग्ण दाखल झाले तर ६९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सोमवारी ५३६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली, तर त्याचवेळी ६९० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. गेले काही दिवस नवीन रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती, परंतू सलग दोन दिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. ही बाब आरोग्य यंत्रणेवरी भार हलका करणारी आहे.कोल्हापूर शहरात सर्वाधिक रुग्णगेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरात सर्वाधिक १३९ नवीन रुग्ण आढळून आले. तर ग्रामिण भागात हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८६ नवीन रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल करवीर तालुक्यात ५६ रुग्ण आढळले. याशिवाय भुदरगड तालुक्यात १५ चंदगड तालुक्यात आठ, गडहिंग्लज तालुक्यात १३ , गगनबावडा तालुक्यात सहा, कागल तालुक्यात नऊ, पन्हाळा तालुक्यात आठ, राधानगरी तालुक्यात १६, शाहूवाडी तालुक्यात १०, शिरोळ तालुक्यात २९ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.तपासणी अहवालही आता झटपटसोमवारी कोरोना चाचणीचे अहवाल देखील मोठ्या संख्याने आले. सर्वसाधारण चाचणीचे १६०७ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी १३६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर २३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ॲन्टीजेन तपासणीचे ६९४ अहवाल प्राप्त झाले त्यापैकी ५५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.याशिवाय खासगी रुग्णालयात तपासणी झालेल्या १५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शेंडापार्क येथील प्रयोगशाळेत तीन मशिन कार्यरत असून ती पूर्ण क्षमतेने काम करीत असल्यामुळे एका दिवसात जवळपास २३०० अहवाल मिळाले.तालुका निहाय आकडेवारी -आजरा - २४९, भुदरगड - ३२४, चंदगड - ४६२, गडहिंग्लज - ३९२, गगनबावडा - ३८, हातकणंगले - १६११, कागल - २७९, करवीर - १६४९, पन्हाळा - ४८२, राधानगरी - ३८९, शाहूवाडी - ३९५, शिरोळ - ७४३, नगरपालिका - ३११३, कोल्हापूर महानगरपालिका - ४७५९, इतर जिल्हा - ३८८.

  •  एकूण रुग्ण संख्या - १५,२७३
  •  बरे झालेले रुग्ण - ७५९६
  • आतापर्यंत मयत - ४२०
  • उपचार घेत असलेले रुग्ण - ७२५७
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर