शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कारागृहाच्या भिंतीही कोरोनाने भेदल्या, कोल्हापुरातील ७५ बंदींना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:22 IST

कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ७५ बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. अवघ्या आठवड्याभरात कारागृहात तीन टप्प्यात बंदीजनांचे हे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामुळे या बंदीजनांना आता आयटीआयजवळील आपत्कालीन कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

ठळक मुद्देकारागृहाच्या भिंतीही कोरोनाने भेदल्या कळंबा कारागृहात ७५ बंदींना कोरोना, पाच महिलांचा समावेश

कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ७५ बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. अवघ्या आठवड्याभरात कारागृहात तीन टप्प्यात बंदीजनांचे हे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामुळे या बंदीजनांना आता आयटीआयजवळील आपत्कालीन कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.राज्यातील कारागृहांप्रमाणेच कळंबा कारागृहात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी कारागृह अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली होती; पण अखेर कोरोनापुढे कारागृहाच्या अभेद्य भिंतीही कमकुवत ठरल्या. कारागृहात बंदीजनांची संख्या जास्त असल्याने त्याद्वारे संसर्ग होऊ नये यासाठी सुमारे ४५० बंदीजनांची रजा व पॅरेलवर मुक्तता केली होती; पण १५ दिवसांपूर्वी दोन वयोवृद्ध बंदी आजारी पडल्याने त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली; त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले.

पण त्यानंतर टप्प्याटप्प्याने बंदीजनांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५, ३७, ३३ अशी तीन टप्प्यांत एकूण ७५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या बंदीजनांना स्वतंत्र क्वारंटाईन यार्ड तयार करून त्यामध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना आपत्कालीन कारागृहात स्थलांतरित करण्यात येणार आहे.पाच महिला व दोन कर्मचारीकारागृहात ४० महिला बंदी आहेत, त्यांपैकी सहा महिलांचे अहवाल पॉझिटव्ह आले. कारागृहात काम करणाऱ्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय अस्ताव्यस्त असणाऱ्या दोन बंदीजनांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.परतलेल्या बंदीजनांनी आणला कोरोनापॅरोल रजा व सुट्ट्या संपल्याने पुन्हा परतलेले काही बंदीजन कारागृहात येताना त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत; पण काही दिवसांनी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, त्यामुळे या बाहेरून आलेल्या बंदींमुळेच कोरोनाने कारागृहात प्रवेश केल्याचे मानले जाते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगkolhapurकोल्हापूर