शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

corona virus : कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय: समूह संसर्गाला निमंत्रणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:32 IST

कोल्हापूर शहरात संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे.

ठळक मुद्देमास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई समूह संसर्गाला निमंत्रणच, कोरोना वाढतोय, अन‌् दुर्लक्षही होतंय

कोल्हापूर : शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता तेव्हा संसर्ग होईल या भीतीमुळे दीड-दोन महिने स्वत:ला कोंडून घेणाऱ्या कोल्हापूरकरांनी आता मात्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याचा, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचना न पाळण्याचा गाफीलपणा, तसेच दुर्लक्ष समूह संसर्गाला आमंत्रण देणारे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संसर्ग नव्हता तेव्हा जेवढी खबरदारी घेतली होती त्याच्यापेक्षा अधिक दक्षता आता घेण्याची आवश्यकता आहे. महापालिका मात्र आज, मंगळवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करीत आहे.जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाचे वादळ कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचले. जिल्हा प्रशासनाने चांगली खबरदारी घेतली. लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी केला. त्यामुळे कोरोनापासून कोल्हापूरकरांचा बचाव झाला. परंतु, पुणे, मुंबई, तसेच अन्य रेडझोनमधील शहरातून नागरिक यायला लागले तसा बाधित रुग्णांची संख्या वाढायला लागली. सुरुवातीला त्याचेही काही वाटले नाही. बाहेरून आला, वेळीच तपासणी झाली आणि अलगीकरणही करण्यात आल्याने कोरोना पसरला नाही. जरी रुग्ण आढळले तरी ते वेळीच क्वारंटाईन, तसेच रुग्णालयात दाखल झाल्याने त्यांच्यापासून अन्य कोणाला फारशी बाधा झाली नाही.परंतु, गेल्या काही दिवसांत ही रुग्ण संख्या वाढत असून, ती कमी होण्याचे नाव घेत नाही. कोरोनाचे रुग्ण आता हजाराचा टप्पा पार करीत आहेत. ही चिंताजनक बाब आहे. अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. भाजी मार्केट, बाजारपेठ अथवा सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे.सामाजिक अंतराचे भानच नाहीअनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले जात नाही, विना मास्क नागरिकांचा वावर आहे. मंडईत अथवा बाजारात गेले तरी त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवले जात नाही. चौकाचौकात, प्रमुख रस्त्यांवर सामूहिकपणे एकत्रितपणे वावरणे सुरू आहे. संसर्ग होईल याचे भान कोणालाही राहिलेले नाही.परस्पर शहरात घुसघोरीशहरातील नागरिकांची तर कोरोनाचे संकट आता टळले आहे अशीच धारणा झाली की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. शहरात अनेकजण नाके चुकवून आले असून, परस्पर घरात गेले आहेत. ग्रामीण भागातसुद्धा पूर्वीसारखी देखरेख राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यापासून धोका वाढलेला आहे. अशा वेळी अधिक काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे.मास्क नसल्यास आजपासून दंडकोल्हापूर महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अधिक कडक भूमिका घेतली असून, जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना दंड करण्याची भूमिका घेतली आहे. त्याचा पहिला दणका पालिकेच्या अधिकाऱ्याला दिला. सोमवारी चक्क आस्थापना अधीक्षक सागर कांबळे यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला. आता ही मोहीम आज, मंगळवारपासून शहरात सुरू केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर