शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

corona virus : जिल्ह्यातील ३२ हजारांहून अधिक जणांचा संपर्कशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:38 IST

गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांची संपर्कशोध मोहीम राबविण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३२ हजारांहून अधिक जणांचा संपर्कशोधजिल्हा परिषदेतून होते नियंत्रण, कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने मोठा ताण

समीर देशपांडेकोल्हापूर : गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांची संपर्कशोध मोहीम राबविण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेतून याबाबत यंत्रणा कार्यरत असून सध्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आता येथील कर्मचाऱ्यांवरही मोठा ताण आला आहे. सामान्य प्रशासन विभाग अतिशय महत्त्वाचे काम जिल्हा परिषदेतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने करीत आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या खूपच कमी होती. त्यावेळी १२ तालुक्यांचा विचार करता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या शोधमोहिमेचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सोपविले. मित्तल यांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गती असलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्यावर ही जबाबदारी सोपविली.यानंतर सुरुवातीला आडसूळ यांनी आपल्याच विभागातील चार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे काम सुरू केले; परंतु सुरुवातीला कमी असणारी रुग्णसंख्या मधल्या टप्प्यात झपाट्याने वाढू लागली. पुन्हा नंतर ती रोडावली आणि १० जुलैनंतर तर शेकडोंनी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येऊ लागले. त्यामुळे साहजिकच या विभागावरील ताण वाढायला सुरुवात झाली आहे.सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, आयजीएम - इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय अशा सहा शासकीय प्रयोगशाळांसह खासगी प्रयोगशाळांमधून पॉझिटिव्ह अहवाल हे आडसूळ यांच्याकडे येतात. त्यानंतर आलेल्या नावांच्या पत्त्यांबाबत खात्री केली जाते.त्यानंतर कोल्हापूर महापालिका, सर्व नगरपालिका आणि त्या-त्या तालुक्यांना पॉझिटिव्ह रुग्णांची नावे आणि पत्ते कळवले जातात. यासाठीचे व्हॉटस‌्ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. त्या त्या तालुक्यानुसार आणि नगरपालिकांनुसार याद्या टाकल्यानंतर मग पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.

तोपर्यंत जिल्हा परिषदेतील या संपर्कशोध मोहीम विभागाच्या वतीने त्यांच्या संपर्कात आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांतील नातेवाईक, ग्रामस्थ, नागरिक यांच्याही याद्या तयार करण्याचे काम सुरू होते. यासाठी सुरुवातीला चार कर्मचारी होते. त्यानंतर पुन्हा सहाजणांची नियुक्ती करण्यात आली आणि आता एकूण ४६ जणांना या कामासाठी आदेश देण्यात आले असून, त्यांना गुरुवारपासून या कामासाठी तैनात करण्यात आले आहे.रात्री १२ पर्यंत कामरात्री १२ पर्यंत प्रयोगशाळेतून जे अहवाल येतात, त्यांची छाननी करून रुग्णांची नावे आणि संपर्कातील नावे त्या-त्या तालुक्यांना पाठवण्याचे काम केले जाते. त्यामुळे यांतील काही निवडक कर्मचाऱ्यांना रात्री १२ पर्यंत झोपता येत नाही. आता अहवाल अगदीच रात्री १२ नंतर येणार असेल तर मात्र ती प्रक्रिया सकाळी लवकर केली जाते.दोन कर्मचाऱ्यांच्या घरी संगणकयातील मुख्य प्रक्रिया पार पाडणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने संगणक त्यांच्या घरी दिले आहेत. सुट्टीच्या दिवशी तसेच जिल्हा परिषदेतील कामाची वेळ संपल्यानंतर ही संपर्कशोध मोहीम सुरू ठेवण्याकरिता या दोघांना घरातून काम करण्यासाठी संगणक दिले आहेत. 

जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार सुरुवातीपासूनच या कामी आम्ही नियोजन केले. जिल्हा परिषदेच्या ५० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे संपर्कशोध मोहिमेचे महत्त्वपूर्ण काम कोल्हापूर जिल्हा परिषद करीत आहे.- रविकांत आडसूळउपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग

हाय रिस्क आणि लो रिस्क संपर्क आकडे (२२ जुलैपर्यंत)तालुका     पॉझिटिव्ह रुग्ण    इतक्या जणांशी संपर्क

  • आजरा                १०५            १२३७
  • भुदरगड              १११             १२७६
  • चंदगड                ३०६             २२६१
  • गडहिंग्लज           १८२            ४१६०
  • गगनबावडा         ००७             ०७६
  • हातकणंगले        ८११             ६९०९
  • कागल                ०८१              ६१५
  • करवीर                ३४१            ३९९३
  • कोल्हापूर मनपा  ५०३           ५८८५ 
  • इतर                    ०४४             ४९४
  • पन्हाळा               १२१            ९७४
  • राधानगरी            १०६          १११०
  • शाहूवाडी               २३१         २०६७
  • शिरोळ                 १३३         ११३७
  • एकूण               ३०८२         ३२१५४
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर