शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

corona virus : जिल्ह्यात तीन महिन्यांत ५४ हजार ७५७ स्राव तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 4:42 PM

कोरोनाचा महामारीने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार ७५७ कोरोना संशयितांच्या स्राव चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५४०७ जणांची चाचणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देजुलैमध्ये तब्बल ३८६० कोरोनाग्रस्त रुग्णांत वाढसीपीआरच्या शेंडा पार्क, डॉ. पाटील हॉस्पिटल प्रयोगशाळेत चाचण्या

कोल्हापूर : कोरोनाचा महामारीने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार ७५७ कोरोना संशयितांच्या स्राव चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५४०७ जणांची चाचणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३८६० पॉझिटिव्ह अहवाल हे फक्त जुलै महिन्यात प्राप्त झाले. त्यामुळे जुलै महिना कोल्हापूर जिल्ह्यासाठी घातक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.कोल्हापूर जिल्ह्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. आतापर्यंत सुमारे १९९ पर्यंत कोरोना बळींचा आकडा पोहोचला असताना या महामारीची भीषणता तीव्र होऊ लागली आहे.मार्चअखेरच्या चार दिवसांत कोरोनाचा शिरकाव कोल्हापूर जिल्ह्यात झाला आणि हळूहळू या कोरोना विषाणूने संपूर्ण जिल्हाच व्यापून टाकला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात कोरोनाचा शिरकाव झाल्ना नाही असे एकही गाव सापडणार नाही.

एप्रिल, मे महिन्यात मुंबई-पुण्याकडील प्रवासी वाढल्याने त्यांची लागण कोल्हापूर जिल्ह्याला झाली. पण त्यावेळी परजिल्ह्यांतून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांची संस्थात्मक विलगीकरण कक्षातच वाढता आकडा होता. त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या डोळे पांढरे करणारी वाटत होती. पण त्यानंतर जून-जुलै महिन्यात जिल्ह्यात समुह संसर्गाने पाय पसरले अन् प्रत्येक गाव- प्रत्येक गल्लीबोळांत कोरोनाचे रुग्ण सापडू लागले.मे महिन्यात जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांचे सरसकट स्राव चाचणी करण्यात आली. सुमारे १६८७५ जणांचे स्राव चाचणी केली, त्यामध्ये ४९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पण त्यानंतर फक्त लक्षणे असणाऱ्यांचीच स्राव चाचणी घेण्यात आली, त्यामुळे जून महिन्यात चाचण्यांचे प्रमाण कमी आले, जूनमध्ये ७१६९ जणांची स्राव चाचणी घेतली, त्यामध्ये ३३३ पॉझिटिव्ह चाचण्या प्राप्त झाल्या.

जुलै महिना तर जिल्ह्याच्या दृष्टीने कर्दनकाळच ठरला आहे. या महिन्यात पर जिल्ह्यातून येणाऱ्यांना लगाम घालण्याचा प्रयत्न झाला असला तरीही याच महिन्यात समूह संसर्ग वाढला. याच महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावाला कोरोनाचा विळखा पडला आहे.

जुलैमध्ये तब्बल २२ हजार २८९ नागरिकांच्या स्राव चाचणी करण्यात आली, त्यामध्ये ३८५९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. विशेष म्हणजे या सर्व चाचण्या सीपीआर रुग्णालयाच्या शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेत तपासण्यात आल्या.त्यामुळे सीपीआरच्या शेंडा पार्क आणि डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातच प्रयोगशाळेत गेल्या तीन महिन्यांत एकूण ५४ हजार ७५७ रुग्णांच्या स्रावाची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ५४०७ अहवाल पॉझिटिव्ह आले तर इतर ४९ हजार २४९ चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.डॉ. डी. वाय. पाटील लॅबमध्ये ७५९८ चाचण्या तपासणीडॉ. डी. वाय.पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण ८४२४ जणांच्या स्रावच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ७५९८ जण निगेटिव्ह तर ७२५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर