शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सर्वेक्षणातील ३४१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 20:21 IST

Coronavirus, zp, health, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून ३४१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही प्राथमिक आकडेवारी असून पुढील आठवड्यात आणखी नेमकी आकडेवारी उपलब्ध होणार आहे. मात्र, उपलब्ध आकडेवारीवरून विचार करता कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसदतीस लाख नागरिकांच्या सर्वेक्षणातून केवळ ३४५ जण पॉझिटिव्ह येतात. याचाच अर्थ नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे आणि संसर्गही कमी होत आहे.

ठळक मुद्देसर्वेक्षणातील ३४१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्हमाझे कुटुंब, माझी जबाबदारी, नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढल्याचे द्योतक

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून ३४१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही प्राथमिक आकडेवारी असून पुढील आठवड्यात आणखी नेमकी आकडेवारी उपलब्ध होणार आहे. मात्र, उपलब्ध आकडेवारीवरून विचार करता कोल्हापूर जिल्ह्यातील साडेसदतीस लाख नागरिकांच्या सर्वेक्षणातून केवळ ३४५ जण पॉझिटिव्ह येतात. याचाच अर्थ नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढली आहे आणि संसर्गही कमी होत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे सर्वेक्षण दोन टप्प्यांत राबविण्यात आले. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत पहिला टप्पा राबविण्यात आला. त्याच घरांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. ही दुसऱ्या टप्प्यातील मोहीम २४ ऑक्टोबरला संपली. त्यानंतर दोन्ही टप्प्यांतील आकडेवारीचे बाराही तालुक्यांतून संकलन सुरू होते. अजूनही ८५ हजार ६४५ घरांतील लोकसंख्येचे निष्कर्ष जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेले नाहीत. या मोहिमेसाठी २२३२ पथके कार्यरत करण्यात आली होती.गावपातळीवर शिक्षक, आशा, ग्रामपंचायतीपासून ते विविध खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून ही मोहीम राबविण्यात आली. ४१ लाख ५४ हजार ९३३ लोकसंख्येपैकी ३७ लाख ५४ हजार ३७ लोकसंख्येच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्यातील २९२ नागरिकांमध्ये सारीची लक्षणे आढळली आहेत.

फ्ल्यूची लक्षणे ५४२० नागरिकांमध्ये आढळली आहेत. अडीच लाखांहून अधिक नागरिकांना जुने आजार असून २८७९ रुग्णांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले. त्यापैकी १८१३ जणांनी चाचणी करून घेतली आणि त्यापैकी ३४१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कार्यक्षेत्र पॉझिटिव्ह रुग्ण

  • १२ तालुके १८०
  • १४ नगरपालिका
  •  नगरपंचायती ०६७
  • कोल्हापूर महापालिका ०९४

शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही सर्वेक्षण मोहीम यशस्वी करण्यात आली. यातील प्राथमिक आकडेवारी हाती आली आहे. अजूनही ८५ हजार घरांची दोन्ही टप्प्यांतील आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत तपासणी केलेल्या ३७ लाख ५४ हजार लोकसंख्येपैकी ३४१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घरोघरी आरोग्य तपासणी झाल्यानंतर अतिशय कमी प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले आहेत तरीही नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर