शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : शहरात २८४ नवीन रुग्णांची भर; पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 16:41 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात नवीन २८४ रुग्ण आढळून आले तर ...

ठळक मुद्देशहरात २८४ नवीन रुग्णांची भर; पाच जणांचा मृत्यूतीव्र आंदोलन करण्याचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात नवीन २८४ रुग्ण आढळून आले तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संपूर्ण जिल्ह्यातील सर्वाधिक ५२३८ रुग्ण हे एकट्या कोल्हापूर शहरात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.कोल्हापूर शहरात सोमवारी सायंकाळी संपलेल्या चोवीस तासांत शहरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये रंकाळा टॉवर येथील ६७ वर्षीय महिला, शनिवार पेठेतील ५७ वर्षीय पुरुष, उत्तरेश्वर पेठेतील ५९ वर्षीय पुरुष, सुर्वेनगर येथील ५५ वर्षीय पुरुष तर गंजी माळ येथील ४६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या १५५ वर जाऊन पोहोचली आहे.तसेच ताराबाई पार्क व राजारामपुरीत प्रत्येकी २१ नवीन रुग्ण आढळून आले. त्याखालोखाल कसबा बावडा १८ , शिवाजी पेठ १४, शाहूपुरी १६, जवाहरनगर ११, कदमवाडीत १३, फुलेवाडी ७ सम्राटनगर १० तर मार्केट यार्ड, देवकर पाणंद, सानेगुरुजी, रायगड कॉलनी येथे प्रत्येकी सहा, मंगळवार पेठेत आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहराच्या सर्वच भागांत कोरोनाचे रुग्ण असून संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.नेमका आकडा किती?शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या व त्यामुळे मृत झालेल्यांची संख्या याची आकडेवारी सीपीआर रुग्णालय तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात येते; परंतु या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे दिसते.

सीपीआर रुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात आतापर्यंतचे रुग्ण ६०११ असून मृत संख्या १४८ इतकी आहे तर त्याचवेळी महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५२३८ कोरोना रुग्ण असून मृत १५५ आहेत. या आकडेवारीत मोठी तफावत आहे. त्यामुळे नेमके कोणते आकडे खरे मानायचे, असा प्रश्न आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर