शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

corona virus : सीपीआरमधील २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 16:11 IST

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये बसविण्यात आलेला २० हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आला.

ठळक मुद्देसीपीआरमधील २० हजार लिटरचा ऑक्सिजन टँक कार्यान्वितरोज २७५ रुग्णांची सोय : आणखी सव्वाशेची लवकरच सोय

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तत्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये बसविण्यात आलेला २० हजार लिटरचा लिक्विड ऑक्सिजन टँक मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आला.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी युद्धपातळीवर निर्णय घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून या टँकच्या खरेदीला मंजुरी दिली होती. आता दिवसाला २७५ रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून, आणखी १२५ रुग्णांसाठी पुरवठा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी भेट देऊन याची पाहणी केली. यावेळी डॉ. उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे हे उपस्थित होते. ३० फूट उंच, दोन मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक असून ४०० क्युबिक मीटर प्रतितास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला.

यातील एक लिटर द्रवापासून ८५० लिटर वायुरूप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून सीपीआरमध्ये १७ ठिकाणी असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटांपर्यंत ऑक्सिजनची सुविधा दिली आहे.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चेन्नईतील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक कंपनीशी संपर्क साधून हा टँक मागविला. तो बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, शाखा अभियंता अविनाश पोळ, कोल्हापूर ऑक्सिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाढवे, तांत्रिक व्यवस्थापक रवींद्र देसाई, संजय दिंडे, अभियंता सुजित प्रभावळे, मेंटेनन्स हेड शैलेश धूळशेट्टी, लगमा मधिहाळ, प्रदीप भोपळे यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर