वाशी प्राथमिक उपकेंद्रात कोरोना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST2021-04-07T04:24:35+5:302021-04-07T04:24:35+5:30

वाशी व परिसरातील लोकांना कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जाण्यासाठी गैरसोयीचे होत असल्याने याकडे या परिसरातील लोकांनी पाठ फिरवली ...

Corona vaccination at Vashi Primary Subcentre | वाशी प्राथमिक उपकेंद्रात कोरोना लसीकरण

वाशी प्राथमिक उपकेंद्रात कोरोना लसीकरण

वाशी व परिसरातील लोकांना कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जाण्यासाठी गैरसोयीचे होत असल्याने याकडे या परिसरातील लोकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांच्या आदेशानुसार वाशी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

यावेळी अश्विनी धोत्रे म्हणाल्या की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीरकण महत्त्वाचे असून नागरिकांनी लस घेऊन आपण व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे. सरपंच गीता लोहार यांनी लसीकरणासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभागाला हवी ती मदत करेल, अशी ग्वाही दिली.

फोटो: ०६ वाशी लसीकरण

ओळ

वाशी (ता. करवीर) येथे कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करवीरच्या माजी सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सरपंच गीता लोहार, संगीता पाटील उपस्थित होत्या.

Web Title: Corona vaccination at Vashi Primary Subcentre