कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग... किचनपासून कटिंगपर्यंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:05+5:302021-07-11T04:18:05+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजांना कात्री लावावी ...

Corona taught costcutting ... from kitchen to cutting ... | कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग... किचनपासून कटिंगपर्यंत...

कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग... किचनपासून कटिंगपर्यंत...

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजांना कात्री लावावी लागली आहे, या कॉस्टकटिंगची जबाबदारी घराघरातील गृहलक्ष्मीने घेतली असून दूध, भाजीपाला, कपडे, केबल, टीव्ही अशा जीवनावश्यक असलेल्या न नसलेल्या दोन्ही प्रकारच्या गरजांवर मुरड घालत संसाराचा गाडा हाकला जात आहे. मात्र यामुळे अनेकदा होणारा वायफळ खर्च थांबला आहे.

कोरोना आणि त्यामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनने गेल्या दीड वर्षापासून गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांपासून ते उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांनाच आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यातच अनेकजणांचा व्यवसाय ठप्प, झाला, नोकऱ्या गेल्या, पगारात कपात झाली आणि त्यात महागाईही वाढली, या परिस्थितीत उत्पन्न वाढवण्याचे मार्गच बंद झाल्याने नागरिक रोजच्या खर्चात कपात करुन कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. दैनंदिन गरजा, मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवण्याची जबाबदारी गृहिणीवर असते. त्यामुळेच कोणकोणत्या गोष्टीत कॉस्ट कटिंग करता येते, या सर्वाधिकाराचा वापर करत महिला आर्थिक ताळेबंद सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

---

कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग

- रोजच्या भाजीपाल्याऐवजी कडधान्यांचा वापर

-टीव्हीचा केबल काढून टाकला.

-दोघांमध्ये एकाच मोबाईलचा वापर

-पाहुणे येणार असतील तरच जास्तीचे दूध

-बाहेरच्या खाद्यपदार्थांवर फुली

-हॉटेलिंग, फिरायला जाणे बंद

-नवीन कपडे, दागिने यांसारख्या अनावश्यक खर्चाला फाटा

----

मी, नवरा आणि मुलगा असा संसार, नवऱ्याला पॅरालिसिस झाल्यापासून घरची आर्थिक जबाबदारी मी बघते. पार्लर चालवते. कोरोनामुळे हे उत्पन्नच थांबल्याने भाजीपाला आणायचेच बंद केले. रेशनचे धान्य मिळते, स्वयंपाकात कडधान्य करते, केबल तर गेल्या वर्षापासून बंदच आहे. जगण्यापुरतं गरजेच्या वस्तूंवरच खर्च करते.

मंजुश्री मुळीक

कसबा बावडा, कोल्हापूर

फोटो नं १००७२०२१-कोल-मंजुश्री मुळीक

--

कोरोनाने तडजोड करायला शिकवले. जगण्याचे महत्त्व कळले. मोबाईल आम्ही दोघात वापरतो, मुलींना खेळणी, केबल असे अनावश्यक खर्च बंद केले. कुटुंबाला घेऊन फिरायला जाणे थांबवून प्रवास खर्च कमी केला. हॉटेलिंग, बाहेरचे खाद्यपदार्थ आणणे सगळं बंद केले. आपण आधी किती अनावश्यक खर्च करत होतो याची आता जाणीव होते हे मात्र खरं.

समृद्धी खारकर

फुलेवाडी, कोल्हापूर

फोटो नं १००७२०२१-कोल-समृद्धी खारकर

--

खासगी ठिकाणचे काम बंद झाले आहे, औषधपाणी आणि जेवणासाठी लागणाऱ्या वस्तू एवढ्यावरच सध्या खर्च चालू आहे. एकच भाजी करायची. पाहुणे येणार असतील तरच जास्तीचे दूध घ्यायचे. मुलांच्या शाळेतही सगळं सुरळीत होईपर्यंत समजून घ्या असे सांगितले आहे. माणूस जगला तर पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत, याचा विचार करुन खर्च करते.

शैला साळोखे

रंकाळा रोड, कोल्हापूर.

फोटो नं १००७२०२१-कोल-शैला साळोखे

----

Web Title: Corona taught costcutting ... from kitchen to cutting ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.