तळसंदेत कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ तपासणी दिलासादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:07+5:302021-06-09T04:30:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे दुकानदार व व्यावसायिकांची ‘कोरोना सुपर स्प्रेडर’ अँटिजन तपासणी करण्यात ...

The Corona ‘Super Spreader’ check at the bottom is heartening | तळसंदेत कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ तपासणी दिलासादायक

तळसंदेत कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ तपासणी दिलासादायक

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथे दुकानदार व व्यावसायिकांची ‘कोरोना सुपर स्प्रेडर’ अँटिजन तपासणी करण्यात आली. या तपासणीतील दिलासादायक बाब म्हणजे ७५पैकी केवळ एकजण पॉझिटिव्ह आढळला आहे.

शुक्रवारी तळसंदेत हातकणंगले पंचायत समितीचे सभापती डॉ. प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी डाॅ. शबाना मोकाशी यांच्या उपस्थितीत अंबप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश गायकवाड यांच्या पथकाने अँटिजेन तपासणी मोहीम राबवली. तळसंदेत आता ७ रुग्ण उपचाराखाली आहेत. यावेळी सरपंच अमरसिंह पाटील, उपसरपंच सावित्री चव्हाण, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल चव्हाण, तलाठी अविनाश कुंभार व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

आशितोष पाटील, अमोल मोहिते, हर्षवर्धन चव्हाण, संजय चव्हाण, उदय शिंदे, राकेश चिमटे, सुशांत चिमटे, अनिकेत शिंदे, बाबासो चव्हाण, योगेश चव्हाण, सचिन चव्हाण, प्रथमेश जाधव, सुरेश जाधव या तरूणांनी रुग्णांची जेवण व औषधांची सोय केली आहे.

Web Title: The Corona ‘Super Spreader’ check at the bottom is heartening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.