कोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:34+5:302021-07-18T04:18:34+5:30

कोल्हापूर : संपूर्ण जिल्हा सोमवारपासून अनलॉक होत असल्याचा निर्णय होत असतानाच कोरोनानेही काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे शनिवारी आलेल्या ...

Corona sickness and death decreased, discharge also increased | कोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढले

कोरोना रुग्ण व मृत्यू घटले, डिस्चार्जही वाढले

कोल्हापूर : संपूर्ण जिल्हा सोमवारपासून अनलॉक होत असल्याचा निर्णय होत असतानाच कोरोनानेही काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे शनिवारी आलेल्या अहवालानंतर स्पष्ट झाले. शनिवारी रुग्णसंख्या व मृत्यूही घटले. नवे ९३८ रुग्ण आढळले, तर ९५६ जण कोराेनामुक्त होऊन घरी परतले. मृत्यूही १८ पर्यंत खाली आले. तब्बल महिनाभरानंतर रुग्णसंख्या हजाराच्या खाली आल्याने कोल्हापूरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेले तीन दिवस स्थिर असणारा आकडा शनिवारी एकदम ९३८ पर्यंत कमी आला. २१ जूनला ९४० इतकी या दोन महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या नोंदविली गेली होती. त्यानंतर आकडे वाढतच गेल्याने चिंता वाढली होती, पण मागील आठवड्यापासून कोरोनाचा विळखा सैल होऊ लागला आहे. मृत्यूही २५ च्या वरच होते, पण शनिवारी तोही आकडा १८ पर्यंत कमी झाला. त्यातही एक मृत्यू मध्यप्रदेशातील आहे. कोल्हापूर शहरात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी रुग्णसंख्या ५८ ने वाढली असली तरी मृत्यू अवघे तीन आहेत. हातकणंगलेत सर्वाधिक सहा मृत्यू आहेत.

चौकट

गगनबावड्यात रुग्ण व मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे. शनिवारी एकही बाधित आढळला नाही आणि मृत्यूही झाला नाही. राधानगरी, भूदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगडमध्ये एकही मृत्यू झालेला नाही, ही आणखी एक दिलासादायक बाब शनिवारी घडली.

आजचे मृत्यू

कोल्हापूर शहर : ०३ कसबा बावडा, गुजरी कॉर्नर, सुभाषनगर

कागल: ०२ पिंपळगाव, रणदिवेवाडी,

करवीर: ०३ वळीवडे, परिते, हलसवडे

हातकणंगले: ०६ पारगाव, इचलकरंजी दोन, पट्टणकोडोली, साजणी, हुपरी,

शिरोळ: ०२ सैनिक टाकळी, जयसिंगपूर,

गडहिग्लज: ०१ कडगाव,

इतर जिल्हा: ०१ गुलेवडी (मध्यप्रदेश)

Web Title: Corona sickness and death decreased, discharge also increased