इचलकरंजीत प्रवाशांची कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:18+5:302021-04-27T04:26:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : बाहेरगावांहून बसेसमधून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांची येथील थोरात चौक परिसरातील भगतसिंग उद्यानाजवळ कोरोना रॅपिड ...

Corona rapid antigen test of passengers in Ichalkaranji | इचलकरंजीत प्रवाशांची कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी

इचलकरंजीत प्रवाशांची कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : बाहेरगावांहून बसेसमधून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांची येथील थोरात चौक परिसरातील भगतसिंग उद्यानाजवळ कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. दोन दिवसांमध्ये वीस प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून, सतराजणांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले होते. बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तसेच वाहनथांब्याच्या ठिकाणी तपासणीसाठी पथकात एक वाहतूकदार संघटना प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शासनाचे प्रतिनिधी व संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. तपासणी पथकाचे तीन सत्रांत काम सुरू राहणार आहे. रविवार व सोमवारी दहा बसेस इचलकरंजी शहरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, बोरिवली, नाशिक, सुरत या ठिकाणांहून प्रवासी आले. वीस प्रवाशांची तपासणी केली असून, सतराजणांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. शिक्के मारण्यात आलेल्या प्रवाशांना प्रशासनाने चौदा दिवस होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी दत्ता माळी, अनिल पाटील, रणजित आवळे, संजय कांबळे उपस्थित होते.

Web Title: Corona rapid antigen test of passengers in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.