राधानगरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:07+5:302021-02-05T07:05:07+5:30
राधानगरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम आज राधानगरी सुरू झाला. तहसीलदार मीना निंबाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर. ...

राधानगरीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम
राधानगरी : कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम आज राधानगरी सुरू झाला. तहसीलदार मीना निंबाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर. शेटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी.बी. गवळी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. येथील ग्रामीण रुग्णालयात आजपासून याची सुरुवात झाली. तालुक्यातील आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडीसेविका अशा १३०० कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. दररोज १०० याप्रमाणे तेरा दिवस हा कार्यक्रम सुरू राहील. त्यानंतर नागरिकांना ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसार लस देण्यात येणार आहे, असे डॉ आर. आर. शेटे यांनी सांगितले.
२४ राधानगरी लसीकरण
फोटो ओळ- राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात आजपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. यावेळी तहसीलदार मीना निंबाळकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर आर.आर. शेटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.जी. बी. गवळी आदी उपस्थित होते.