Corona patients cross the 300 mark, four die | कोरोनाच्या रुग्णांनी ३०० चा टप्पा ओलांडला, चौघांचा मृत्यू

कोरोनाच्या रुग्णांनी ३०० चा टप्पा ओलांडला, चौघांचा मृत्यू

शहरापाठोपाठ नगरपालिका क्षेत्रात ३१ नवे रुग्ण सापडले असून, बाराही तालुक्यांत गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३० रुग्णांची नोंद झाली आहे. आजरा तालुक्यात १५, भुदरगड चार, चंदगड एक, गगनबावडा एक, हातकणंगले २०, कागल तीन, करवीर २८, पन्हाळा १३, राधानगरी तीन, शिरोळ तीन आणि इतर जिल्ह्यातील १५ रुग्णांची नोंद झाली आहे. केवळ शाहूवाडी तालुक्यात एकही रुग्ण आढळलेेला नाही.

गेल्या २४ तासांत शाहूवाडी तालुक्यातील आंबार्डे येथील ५२ वर्षीय पुरुषाचा, कोतोली येथील ४३ वर्षीय पुरुष, पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील ७७ वर्षीय पुरुष आणि देवकर पाणंद येथील २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ८१४ जणांची तपासणी करण्यात आली असून, १६१० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत, तर १५१ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे.

चौकट

२२ वर्षीय युवकाचा मृत्यू धक्कादायक

देवकर पाणंद येथील २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक मानली जाते. त्याला चिंताजनक परिस्थितीत खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम मेंदूवर झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

Web Title: Corona patients cross the 300 mark, four die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.