बानगेतील कोरोना रुग्णांवर होणार गावातच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:23+5:302021-05-20T04:25:23+5:30

बानगे(ता. कागल) येथील कोरोना रुग्णांवर गावातच उपचार व्हावेत, नागरिकांवर आर्थिक ताण येऊ नये या हेतूने ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून तरुणांच्या ...

Corona patients in Banga will be treated in the village itself | बानगेतील कोरोना रुग्णांवर होणार गावातच उपचार

बानगेतील कोरोना रुग्णांवर होणार गावातच उपचार

बानगे(ता. कागल) येथील कोरोना रुग्णांवर गावातच उपचार व्हावेत, नागरिकांवर आर्थिक ताण येऊ नये या हेतूने ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून तरुणांच्या पुढाकाराने दोन ऑक्सिजन बेडसह २० बेडचे कोरोना सेंटर उभारले आहे. प्राथमिक शाळेत हे सेंटर केले आहे. सिध्दनेर्ली जि. प. मतदारसंघातील पहिलेच सेंटर आहे. येथे कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि उपाययोजनेच्या माध्यमातून अत्यंत उल्लेखनीय धडपड सुरू आहे.

निपाणी येथील डॉ. प्रशांत अथणी यांनी ५बेड, तानाजी पाटील(फौजी) यांनी ऑक्सिजनचे मशीन दिले. तर नेताजी कमळकर, रमेश रेडेकर (सरंबळवाडी), विपुल विलास पाटील यांनीही मदत केली.

यासाठी सरपंच वंदना रमेश सावंत, पं. स.सदस्या मनीषा सावंत, उपसरपंच दत्तात्रय लंबे, सुनील बोंगार्डे, युवराज पाटील, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब गुरव, अर्जुन गुरव, चंद्रशेखर सावंत, अमोल सावंत, अशोक पाटील, तुकाराम सावंत, बाबुराव हिरुगडे, बाळ पोतदार, विनायक पाटील, निलेश कदम, विनायक जगदाळे, युवराज बोंगार्डे, मदन पाटील, मनोहर पाटील, ग्रामसेवक पी. के. पाटील, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Corona patients in Banga will be treated in the village itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.