सलग दुसऱ्यादिवशी कोरोना रुग्ण, मृत्यू कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST2021-07-25T04:22:07+5:302021-07-25T04:22:07+5:30

कोल्हापूर : सलग दुसऱ्यादिवशी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या कमी आली आहे. त्यामुळे महापुराच्या काळात थोडा दिलासा मिळाला ...

Corona patient for second day in a row, death reduced | सलग दुसऱ्यादिवशी कोरोना रुग्ण, मृत्यू कमी

सलग दुसऱ्यादिवशी कोरोना रुग्ण, मृत्यू कमी

कोल्हापूर : सलग दुसऱ्यादिवशी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या कमी आली आहे. त्यामुळे महापुराच्या काळात थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ९६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, बाराजणांचा मृत्यू झाला आहे. यातील दहाजण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.

कोल्हापूर शहरात २२०, करवीर तालुक्यात १६८ आणि हातकणंगले तालुक्यात ९६ जणांना कोरोना झाला आहे, तर राधानगरी, आजरा तालुक्यातील प्रत्येकी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १६८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ११ हजार ८८४ जणांवर उपचार सुरू आहेत.

चौकट

तालुकावार मृत्यू

राधानगरी ०२

सोन्याची शिरोली, सोळांकूर

आजरा ०२

गजरगाव, वेळवट्टी

करवीर ०१

कोपार्डे

भुदरगड ०१

वाघापूर

हातकणंगले ०१

कबनूर

कोल्हापूर शहर ०१

राजारामपुरी

हातकणंगले ०१

अंबपवाडी

इचलकरंजी ०१

पाटील गल्ली

इतर जिल्हे ०२

बोरगाव, पिंगुळी

Web Title: Corona patient for second day in a row, death reduced