कोरोना रुग्ण आणि मृत्युसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:30 IST2021-09-08T04:30:21+5:302021-09-08T04:30:21+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णात पुन्हा किंचित वाढ झाली असून, मृत्युसंख्याही पाचवर गेली आहे. ...

Corona patient and mortality increase | कोरोना रुग्ण आणि मृत्युसंख्येत वाढ

कोरोना रुग्ण आणि मृत्युसंख्येत वाढ

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णात पुन्हा किंचित वाढ झाली असून, मृत्युसंख्याही पाचवर गेली आहे. गेले चार दिवस ही संख्या कमी होती. परंतु आता पुन्हा नवी रुग्णसंख्या दीडशेच्यावर गेली आहे. सध्या १२९८ रुग्णांवर उपचार सुरू असून १५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोल्हापूर शहरात ५१ तर करवीर तालुक्यात नवे २२ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. गगनबावडा आणि कागल तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. उर्वरित १० तालुक्यांमध्ये नव्याने रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये कोल्हापूर शहरातील आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.

मंगळवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून यामुळे ही आता घरोघरी ताप, थंडीचे रुग्ण वाढणार आहेत. अशातच शासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

चौकट

तालुकावार मृत्यू

कोल्हापूर शहर ०२

कदमवाडी १, बुधवार पेठ १

करवीर ०२

आर. के. नगर,१, उजळाईवाडी

इतर जिल्हा ०१

संजयनगर, सांगली

Web Title: Corona patient and mortality increase