शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

कोल्हापुरात कोरोनाचा उद्रेक : नऊ जणांचा मृत्यू : ३५८ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:35 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ३५८ नवीन रुग्णांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. संसर्ग सुरु झाल्यापासून एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनाचा उद्रेक नऊ जणांचा मृत्यू : ३५८ नवे रुग्ण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील तब्बल ३५८नवीन रुग्णांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला.

संसर्ग सुरु झाल्यापासून एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांवरील कोरोनाचे संकट अधिकच गंभीर बनले असून आरोग्य यंत्रणेपुढे या संकटावर मात करण्याचे एक जबरदस्त आव्हान निर्माण झाले.संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या प्रभावाखाली गेला असून दिवसे दिवस वाढणारी रुग्ण संख्या आणि मृत्यू होण्याचे प्रमाण पाहता आरोग्य यंत्रणा निश्चितच दडपणाखाली आहे. कोरोनाचा फैलाव इतक्या झपाट्याने होत आहे, त्यामुळे सगळी यंत्रणाच गोंधळून गेली आहे. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर यापुढे बाधित रुग्णांना ठेवायचे कोठे आणि त्यांच्यावर उपचार करायचे कसे असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे.कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंतचा सगळ्यात खराब दिवस म्हणजे शुक्रवार आहे. केवळ चोवीस तासात विक्रमी संख्येने ३५८ रुग्णांची संख्या नोंदविली गेली. ही कोल्हापूरकरांसाठी धक्कादायक बाब आहे. एकीकडे जिल्हा व आरोग्य प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र उद्रेक वाढतच चालला आहे.शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर शहरात ९० तर त्यापाठोपाठ इचलकरंजी शहरात ७० रुग्ण आढळून आले. त्यामुळे ही दोन्ही शहरे पार हादरुन गेली आहेत. करवीर तालुक्यात ३३, चंदगड तालुक्यात ६, गडहिंग्लज तालुक्यात ११, पन्हाळा तालुक्यात २०, शिरोळ तालुक्यात १५, हातकणंगले तालुक्यात ३७, कागलमध्ये ३, शााहुवाडी तालुक्यात १३, राधानगरी तालुक्यात ५, भुदरगड तालुक्यात ६ तर इतर जिल्ह्यातील ६ नवीन रुग्ण आढळून आले.चंदगड, गडहिंग्लजला दिलासाचंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले तालुक्यात रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. मागच्या काही दिवसात तेथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. मात्र कोल्हापूर व इचलकरंजी ही दोन प्रमुख शहरे तसेच हातकणंगले तालुक्यात मात्र कोरोनाचा फैलावाची गती काही कमी यायला तयार नाही. कुटुंब संसर्ग तसेच समुह संसर्ग झाला असल्यासारखे येथे रुग्ण वाढत आहेत.शहरवासियांच्या मनात धडकीकोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसापासून रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंत हा आंकडा ६१७ वर जाऊन पोहचला होता. त्यात दिवसभरात ९० रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरवासियांच्या मनात कोरोनची धडकी भरली. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर सन्नाटा पसरला आहे. एरव्ही काही कारणाने बाहेर पडणाऱ्या नागरीकांनी घरात बसणेच पसंत केले आहे.चावीस तासात झालेले मृत्यू -१. वसगडे ता. करवीर - ७२ वर्षीय पुरुष.२. कोतोली, ता. पन्हाळा - ४८ वर्षीय पुरुष.३. हुपरी, ता, हातकणंगले - ५७ वर्षीय पुरुष.४. टोप, ता. हातकणंगले - ७३ वर्षीय पुरुष.५. शिवाजी पेठ, कोल्हापूर - ४८ वर्षीय महिला.६. गांधीनगर, ता. करवीर - ६२ वर्षीय पुरुष.७. रंकाळा टॉवर, कोल्हापूर - ४८ वर्षीय पुरुष.८. कंभारगल्ली, कोल्हापूर - ६५ वर्षीय महिला.९. गैबी चौक, कागल ता, कागल - ९० वर्षीय पुरुष.१०. रिंगरोड,इचलकरंजी, ३५ वर्षीय महिला.११. शिवाजी चौक हुपरी - ४५ वर्षीय पुरुष.रुग्णांचा तपशिल असा -

  •  चोवीस तासात कोरोना बाधितांची संख्या - ३५८
  •  चोवीस तासात मृत्यू झालेल्यांची संख्या - ११
  • आतापर्यंतची एकूण रुग्ण संख्या - ३६६५
  •  उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या - २३८७
  •  घरी गेलेले रुग्ण - ११७९

तालुका निहाय आकडेवारी अशी -आजरा - १०४, भुदरगड - ९९, चंदगड -३३२, गडहिंग्लज -१९६, गगनबावडा - ०७, हातकणंगले -२४४, कागल - ७७, करवीर - ४२०, पन्हाळा -१६१, राधानगरी -१०९, शाहूवाडी - २४६, शिरोळ - १०६, नगरपालिका हद्द - ८४३, कोल्हापूर महानगरपालिका - ६६२ इतर जिल्हा - ५९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर