कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर पुन्हा वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, तसेच मृत्युसंख्याही वाढत आहे. नवे ७११ रुग्ण आढळले असून, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ७२१८ रुग्णांवर उपचार सुरू असून, ८२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोल्हापूर शहरात १६८, करवीर तालुक्यात १३० आणि हातकणंगले तालुक्यात १०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर कोल्हापूर शहरात तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हातकणंगले तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
तालुकावार मृत्यू
कोल्हापूर १२
सुभाषनगर २, जवाहरनगर, फुलेवाडी, शिवाजी पेठ, शहर, सोमवार पेठ, शनिवार पेठ, कदमवाडी, चिले कॉलनी, पोवारनगर, शाहूपुरी
हातकणंगले ०४
हातकणंगले, कबनूर, मनपाडळे, कुंभोज
कागल ०३
कागल, सिद्धनेर्ली, करनूर
करवीर ०२
शिंगणापूर, पाचगाव
इचलकरंजी ०२
पन्हाळा ०२
पन्हाळा, पैजारवाडी
भुदरगड ०१
पळशिवणे