शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

corona in kranataka : कर्नाटकाने ओलांडला हजाराचा टप्पा, नव्याने आढळले 69 कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:41 IST

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते बेंगलोर यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 15 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 69 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 1056 इतकी झाली आहे.

ठळक मुद्देकर्नाटकाने ओलांडला हजाराचा टप्पानव्याने आढळले 69 कोरोना रुग्ण

बेळगाव  : कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते बेंगलोर यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 15 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 69 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 1056 इतकी झाली आहे. थोडक्यात गेल्या 24 तासात राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.राज्यात गुरुवार दि. 14 मे रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शुक्रवार दि. 15 मे 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 69 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. बेळगाव जिल्ह्यात मात्र गेल्या 24 तासात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

राज्यात नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित यांपैकी सर्वाधिक रुग्ण मंगळूर जिल्ह्यातील आहेत. मंगळूर जिल्ह्यात 15 कोरोनाग्रस्त आढळून आले असून त्याखालोखाल बेंगलोर शहर आणि मंड्या येथे प्रत्येकी 13 रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे बिदर व हासन जिल्ह्यात प्रत्येकी 7, कलबुर्गी येथे 3, चित्रदुर्ग येथे 2 आणि कोलार, शिमोगा, बागलकोट व कारवार या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे.राज्यात आत्तापर्यंत 1 लाख 33 हजार 724 स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यापैकी 1 लाख 32 हजार 74 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. राज्यात आतापर्यंत बेंगलोर शहरांमध्ये सर्वाधिक 202 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून यापैकी 101 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बेंगलोर खरोखर बेळगाव (114), दावणगिरी (88) व म्हैसूर (88) हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. राज्यात आतापर्यंत 480 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून अ‍ॅक्टिव्ह केसीस एकूण 539 इतक्या आहेत. यापैकी 11 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत एकूण 36 जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक