शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

CoronaVirus Lockdown : मराठा कॉलनी पूर्वपदावर, जीवनावश्यक वस्तू घरपोहोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:03 IST

कोरोनाबाधित महिला आढळून आल्यामुळे धसका घेतलेल्या मराठा कॉलनी व परिसरातील रहिवाशांच्या मनावरील ताणतणाव हळूहळू कमी होत असून, तेथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. पोलीस प्रशासन तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी घरपोहोच सेवा देण्यास सुरुवात केल्यामुळे रहिवाशांची गैरसोय देखील टळली आहे.

ठळक मुद्दे मराठा कॉलनी पूर्वपदावर, जीवनावश्यक वस्तू घरपोहोचमहापौरांच्या पुढाकाराने घरोघरी मोफत भाजी वितरण

कोल्हापूर : कोरोनाबाधित महिला आढळून आल्यामुळे धसका घेतलेल्या मराठा कॉलनी व परिसरातील रहिवाशांच्या मनावरील ताणतणाव हळूहळू कमी होत असून, तेथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. पोलीस प्रशासन तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी घरपोहोच सेवा देण्यास सुरुवात केल्यामुळे रहिवाशांची गैरसोय देखील टळली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्यानंतर आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे तपासणी अहवाल निर्दोष आल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच सोमवारी कसबा बावडा परिसरातील दाट वस्ती असलेल्या मराठा कॉलनीत एक महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले; त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह जिल्हा प्रशासन देखील हडबडून गेले; पण याही परिस्थितीतून सर्वजण सावरत आहेत. त्यांच्यात आता धीर आला आहे; पण मराठा कॉलनी, साई कॉलनी, श्री कॉलनीसह अन्य परिसर क्वारंटाईन करण्यात आला असून, लोकांना घराबाहेर पडण्यास पूर्णत: मज्जाव करण्यात आला आहे.

दोन दिवस प्रचंड तणाव तसेच दडपणाखाली गेल्यानंतर मात्र तेथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. पोलीस, महापालिका तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून कोणाची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.क्वारंटाईन परिसरात दूध, औषधे, धान्य, गॅस अशा वस्तूंचा पुरवठा बुधवारपासून सुरू झाला. गुरुवारी भाजीची खूपच गरज असल्याची माहिती कळताच महापौर निलोफर आजरेकर, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी तीन टेम्पो भरून भाजी तेथे पाठविली. वांगी, दोडका, कोबी, टोमॅटो, ढबू, गाजर, बीट, मिरच्या अशा प्रकारची भाजी घरोघरी जाऊन मोफत वाटण्यात आली. शौकत बागवान, फिरोज बागवान, मुस्ताक फरास, रफिक बालम बागवान, बाबूराव कांडेकर, इर्शाद बागवान, सर्फराज लष्करे बागवान ही मंडळीही मदतीला धावून आली.सदरची भाजी हातात मास्क आणि हँड ग्लोजचा वापर आणि हँड सॅनिटायझयरचा वापर करत, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत नामदेव ठाणेकर, आर्शिल मुजावर, रोहित ठाणेकर, कपिल पुंगावकर, कुमार ठाणेकर, विष्णू जाधव, बंडू पुंगावकर, शिवाजी जाधव, ओंकार पाटील, मोहित मंदारे, सचिन माळी, सचिन पाटील, पोलीस कर्मचारी किरण वावरे, संदीप जाधव, दिग्विजय चौगले, दिगंबर साळोखे यांनी अतिशय शिस्तबद्धरीत्या प्रत्येक घरात वितरीत केली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर