शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कोरोनाचा संसर्ग ओसरतोय :रुग्णालयात ३६४, घरी ६१८ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 12:44 IST

CoronaVirus, kolhapurnews, cprhospital कोरोना जिल्ह्यातून हद्दपारच्या उंबरठ्यावर असून, कोविड रुग्णालयात फक्त ३६४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर लक्षणे नसणारे सुमारे ६१८ कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकूण ९८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत ४६ नवे रुग्ण वाढले, तर हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील २७ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग ओसरतोय :रुग्णालयात ३६४, घरी ६१८ रुग्णांवर उपचार सुरू रुकडीतील युवकाचा मृत्यू; दिवसभरात ३२ जणांना डिस्चार्ज

 कोल्हापूर : कोरोना जिल्ह्यातून हद्दपारच्या उंबरठ्यावर असून, कोविड रुग्णालयात फक्त ३६४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर लक्षणे नसणारे सुमारे ६१८ कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकूण ९८२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या चोवीस तासांत ४६ नवे रुग्ण वाढले, तर हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील २७ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची नोंद आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिक सुखावला असला तरीही कोरोनाची भीती अद्याप नागरिकांच्या मनातून कमी झालेली नाही. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा नागरिकांनी पूर्वीप्रमाणे गजबजलेल्या दिसत असल्या तरीही प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर मास्क दिसत आहे. मास्क नसणाऱ्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागत आहे.|गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात नव्या ४६ रुग्णांची भर पडली. त्यामध्ये कोल्हापूर शहरात १०, करवीर तालुक्यात ७, शिरोळ व हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी ५, शाहूवाडी व चंदगड तालुक्यात प्रत्येकी ३, तर गगनबावडा तालुक्यात एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४८,१८९ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात ३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या ४५,५६४ वर पोहोचली आहे.

त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण ९८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी फक्त ३६४ रुग्णांवर विविध कोरोना रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शिवाय ग्रामीण व नगरपालिका हद्दीतील ११४ रुग्ण व कोल्हापूर शहरातील ५०४ रुग्ण लक्षणे नसल्याने घरीच राहून उपचार घेत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत रुकडी (ता. हातकणंगले) येथील एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या १६४३ वर पोहोचली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी :

आजरा - ८४५, भुदरगड-१२०८, चंदगड-११७२, गडहिंग्लज-१४०६, गगनबावडा-१४२, हातकणंगले-५२३३, कागल-१६३८, करवीर-५५४७, पन्हाळा-१८३७, राधानगरी-१२१३, शाहूवाडी-१३२३, शिरोळ-२४५९, नगरपालिका-१३४३, कोल्हापूर शहर-१४६०४, इतर जिल्हा/राज्य-२२१९. (एकूण रुग्ण-४८१८९, मृत्यू-१६४३)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर