कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:49+5:302021-07-14T04:27:49+5:30
: कोरोनाने मृत्युमुखी पडलेले कुर्डू (ता. करवीर) येथील माजी सैनिक राजाराम दादू पाटील व त्यांच्या पत्नी शकुंतला राजाराम पाटील ...

कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबाला मदत
: कोरोनाने मृत्युमुखी पडलेले कुर्डू (ता. करवीर) येथील माजी सैनिक राजाराम दादू पाटील व त्यांच्या पत्नी शकुंतला राजाराम पाटील
यांच्या कुटुंबाला हळदी (ता. करवीर) येथील
आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन व ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तू व अर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
हळदी (ता. करवीर) येथे नोकरीनिमित्त हळदी येथे स्थायिक झालेले कुर्डू(ता.करवीर) येथील माजी सैनिक राजाराम पाटील यांचे सर्व कुटुंब संकटात सापडले व त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते लाखो रुपये खर्चून ही घरातील कर्ता पुरुष असलेले राजाराम पाटील व त्याची पत्नी शकुंतला पाटील यांचा मुत्यू झाला व हे पाटील कुटुंबीय अर्थिक अडचणीत सापडले. यांना मदतीसाठी माजी सैनिक वेल्फेअर संघटना, ग्रामस्थ सरसावले व त्या कुटुंबाला आवश्यक असणारे सर्व वस्तू खरेदी केल्या त्याच्या कुटुंबीयांना प्रदान केल्या तसेच राजाराम पाटील यांच्या मुलाच्या वर्गमित्रांनी देखील वर्गणी काढून दहा हजार रुपये रक्कम रोख रक्कम स्वरूपात दिली.
यावेळी माजी सैनिक वेल्फेअर संघटनेचे अध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष आनंदा कांबळे, उपसरपंच बाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, रामचंद्र नकाते, प्रदीप पाटील, पृथ्वीराज पाटील, आकाश गुरव, बाळासोा पाटील, उत्तम टिपुगडे आदी उपस्थित होते.