म्हाकवेतील दांपत्याचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST2021-05-09T04:24:55+5:302021-05-09T04:24:55+5:30
कोल्हापूर व सिंधुदुर्ग येथे कार्यरत असताना उत्कृष्ट कार्यप्रणालीमुळे प्रशासनासह जनमानसात ते परिचित होते. सून, मुलासह या कुटुंबातील पाच जण ...

म्हाकवेतील दांपत्याचा कोरोनाने मृत्यू
कोल्हापूर व सिंधुदुर्ग येथे कार्यरत असताना उत्कृष्ट कार्यप्रणालीमुळे प्रशासनासह जनमानसात ते परिचित होते.
सून, मुलासह या कुटुंबातील पाच जण वैद्यकीय क्षेत्रात आहेत. मात्र,कोरोनासारख्या महामारीपासून त्यांना रोखू शकले नाहीत. त्यामुळे कोरोनापासून अत्यंत सावध रहा आपली काळजी घ्या असा सल्ला हे कुटुंबीय देताना दिसत आहेत.
दरम्यान, ४ मे रोजी सुशीला यांचा मृत्यू झाला. तर ७ मे रोजी दिनकर यांचा मृत्यू झाला. दोघांनाही अंत्यविधीच्या वेळी प्रतीक्षा रांगेतून ३० नंबरचाच बेड दहनासाठी मिळाल्याने शेवटच्या घटकेपर्यत त्यांच्या असणाऱ्या साथीबाबत नातेवाइकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.