शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

गोकुळच्या शाहूवाडी तालुक्यातील ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 17:17 IST

CoronaVirus GokulMilk Kolhapur : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सुभाष सदाशिव पाटील (वय ५४) यांचे शनिवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते गोकुळचे ठरावधारक असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित असल्याने निवडणूक यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देगोकुळच्या शाहूवाडी तालुक्यातील ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू डोणोलीच्या दूध संस्थेचे प्रतिनिधी : वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित

कोल्हापूर : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सुभाष सदाशिव पाटील (वय ५४) यांचे शनिवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते गोकुळचे ठरावधारक असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित असल्याने निवडणूक यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे.गोकुळचीनिवडणूक जाहीर झाल्यापासून अनिश्चिततेचे सावट राहिले आहे. त्यात सत्तारूढ गटाने न्यायालयीन लढाई सुरू ठेवल्याने ठरावधारकांमध्ये संभ्रमावस्था आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक प्रक्रिया सुरू असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हाच मुद्दा घेऊन सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. यावर सोमवारी सुनावणी होत आहे.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, त्यात गोकुळ निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. गाठीभेटी सुरू असल्या तरी संसर्ग होण्याची भीती इच्छुक उमेदवारांसह ठरावधारकांमध्ये आहे. वीसहून अधिक ठरावधारक कोरोनाबाधित आहेत. शनिवारी डोणोली येथील सदाशिव पाटील दूध संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाहू मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे गोकुळच्या ठरावधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गोकुळच्या मतदानासाठी पंधरा दिवस राहिले आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते माजी सरपंच वैशाली पाटील यांचे दीर, तर ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील यांचे भाऊ होत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर