कोरोनाने वडिलांनंतर मुलाचे चौथ्या दिवशी निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:12+5:302021-06-18T04:17:12+5:30
बोरवडे : बोरवडे (ता. कागल) येथील सध्या बिद्री मौनीनगर परीट वसाहतीत राहणारे भीमराव दौलू परीट (वय ६४) ...

कोरोनाने वडिलांनंतर मुलाचे चौथ्या दिवशी निधन
बोरवडे : बोरवडे (ता. कागल) येथील सध्या बिद्री मौनीनगर परीट वसाहतीत राहणारे भीमराव दौलू परीट (वय ६४) आणि त्यांचा मुलगा चंद्रकांत भीमराव परीट (वय ३८) या पित्रापुत्रांचे कोरोनाने चार दिवसांच्या अंतराने निधन झाले. घरातील कर्त्या पुरुषांच्या अकाली निधनाने परीट कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून बोरवडे-बिद्री परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
भीमराव परीट हे बिद्री साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. तर गुरुवारी सकाळी (गुरुवार, दि.१७) रोजी अकरा वाजता चंद्रकांत यांचेही निधन झाले. भीमराव परीट यांनी बिद्री साखर कारखान्याच्या मौनीनगर कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. तर त्यांचा मुलगा चंद्रकांत परीट हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. परीट पितापुत्रांचा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असायचा.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
१७ भीमराव परीट, १७ चंद्रकांत परीट