शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

corona cases in kolhapur : कोल्हापुरात कोरोनाचा सुपर रेकॉर्ड, तब्बल २५९९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 11:56 IST

corona cases in kolhapur : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोरोनाने आपले रंग दाखवत आकडा तब्बल २५९९ वर नेऊन ठेवल्याने कोल्हापूरकरांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. मृत्यूचा आकडा ४५ वर स्थिर राहिल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर शहरात आजवरचा सर्वाधिक ६४७ रुग्णाचा आकडा गाठला आहे, पाठोपाठ हातकणंगले ३६४ तर करवीर मध्ये ३५८ रुग्ण सापडले आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनाचा सुपर रेकॉर्ड, तब्बल २५९९ नवे रुग्णकोल्हापूर शहर आणि हातकणंगलेमध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट

कोल्हापूर: कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोरोनाने आपले रंग दाखवत आकडा तब्बल २५९९ वर नेऊन ठेवल्याने कोल्हापूरकरांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. मृत्यूचा आकडा ४५ वर स्थिर राहिल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर शहरात आजवरचा सर्वाधिक ६४७ रुग्णाचा आकडा गाठला आहे, पाठोपाठ हातकणंगले ३६४ तर करवीर मध्ये ३५८ रुग्ण सापडले आहेत.कोल्हापुरात मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवण्यास सुरुवात केली. बुधवारी या लाटेने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार २५९९ नवे रुग्ण बाधित आढळले. १६२२ जण कोरोना मुक्त झाले तर १४ हजार १८९ जण अजूनही उपचार घेत आहेत. यात इतर जिल्ह्यातील १६७ रुग्ण आहेत तर मृत्यू झालेल्या ४५ पैकी ४० जण जिल्ह्यातील तर ५ जण जिल्ह्याबाहेरील आहेत.कागल, पन्हाळ्यात धोका वाढलाकागल आणि पन्हाळ्यात फारसा आकडा नव्हता पण बिढवरी पन्हाळ्यात १३५ तर कागलमध्ये १०१ रुग्ण आढळले. पन्हाळ्यात मृत्यूही जास्त झाले आहेत.कोल्हापुरात रुग्णसंख्या दुप्पटकोल्हापुरात दुसऱ्या लाटेत बाधितांचा आकडा जास्तीत जास्त ३00 ते ३६0 पर्यंत गेला होता, पण बुधवारी यात दुप्पटीने भर पडली. तब्बल ६४७ नवे बाधित सापडले.कोरोनाने झालेले मृत्यू

  • कोल्हापूर शहर ५ रजोपाध्ये नगर, टाकळा, बिंदू चौक, जरग नगर, सूर्या कॉलनी
  • शिरोळ: ३ हेरवाड, आकिवाट, झेंडाचौक शिरोळ
  • राधानगरी: १ सावर्डे
  • कागल: ४ केनवडे, उंदरवाडी, सांगावं, पसारेवाडी
  • हातकणंगले:८ माणगाव, पेठवडगाव, तळदंगे तारदाळ, जे. के. नगर, कबनूर, रांगोळी, अंबप
  • करवीर: ५ गोकुळ शिरगाव, उचगाव, आरे, वाकरे, शिरोली
  • पन्हाळा: ७ पिसातरी, पोर्ले तर्फ ठाणे, वारणा, जाखले, जोतिबा, मोहरे
  • गडहिंग्लज: ३अत्याळ, जरळी, गडहिंग्लज शहर
  • इचलकरंजी: ३ खंजीर मळा, आंबेडकर नगर,इचलकरंजी
  • इतर जिल्हा

कोगणोली, सांगली, हुक्केरी, कुडाळ, पंत बाळकुंदरीएका दिवसात संख्या हजाराने वाढलीकडक लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सोमवारी लोकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली. लॉक उठला त्या दिवशी १५00 चा असणारा आकडा एकदम एका दिवसात एक हजाराने वाढल्याने धडकी भरली असून धोरणाचा आणि वागण्याचाही पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.एवढ्या रुग्णांना ठेवायचे कुठेकोल्हापूर रेडझोनमध्ये आल्याने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच पेशंटमुळे बेड फुल्ल आहेत, त्यात एकदम १ हजाराने रुग्ण वाढल्याने आणि अजून पुरेसे कोविड सेंटर सुरू झालेले नसल्याने या रुग्णांना ठेवायचे कुठे आणि उपचार करायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर