शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : कोरोना संसर्गदर घटला, मृत्यूदर अजूनही चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 12:38 IST

corona cases in kolhapur :१०६६ नवे कोरोनाबाधित आढळले तर ३६ जणांनी जीव गमावला. यातील एक बेळगाव जिल्ह्यातील आहे, उर्वरित ३५ मृत्यू हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आता मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गदर घटला, मृत्यूदर अजूनही चिंताजनककोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यू

कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे आकडे सलग चौथ्या दिवशी कमी आल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे, पण अजूनही मृत्यूदर जैसे थे असल्याने चिंतेचे वातावरण आहे. रविवारी १०६६ नवे कोरोनाबाधित आढळले तर ३६ जणांनी जीव गमावला. यातील एक बेळगाव जिल्ह्यातील आहे, उर्वरित ३५ मृत्यू हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे आता मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या महिन्याभरात प्रथमच १० हजार १८६ पर्यंत खाली आली आल्याने चौथ्या टप्प्यात असलेल्या कोल्हापूरला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर अजूनही साडेतेरा टक्केवर आहे, तो दहा टक्केच्या आत आला तर लॉकडाऊनमधून थोडासा दिलासा मिळणार आहे. गेल्या चार दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी कमी होत चालली असून बाधितांचा आकडा बऱ्याच दिवसांनी दीड हजाराच्या आत आला आहे.जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पाचपर्यंत ६ हजार १२७ ॲन्टिजन टेस्ट झाल्या, त्यातील ५ हजार ६२४ अहवाल निगेटीव्ह आले तर ६७४ अहवाल आरटीपीसीआरला पाठवण्यात आले. आरटीपीसीआरसाठी २ हजार ५२७ स्वॅब संकलीत झाली, त्यातील २ हजार २८५ अहवाल निगेटिव्ह आले. २३१ अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी दवाखान्यात १०१९ स्वॅब तपासणीला घेतले, त्यातील ३६२ अहवाल पॉझिटिव्ह आले.तालुकानिहाय मृत्यू

  • कोल्हापूर शहर: १० राजारामपुरी, दौलतनगर, आरकेनगर, गंगावेश, शुक्रवार पेठ, टेंबलाईवाडी, राजारामपुरी, बोंद्रेनगर, कनाननगर, शाहू मिल,
  • करवीर: ७ बाचणी, शिंगणापूर, कावणे, कोपार्डे, केर्ली, कणेरीमठ, मोरेवाडी
  • राधानगरी: २ यळवडे, मजरे कासारवाडे,
  • हातकणंगले: ४ रांगोळी, हेर्ले, तळसंदे, चावरे,
  • कागल : २ माद्याळ, मुरगुड,
  • गडहिग्लज : २ आत्याळ, भडगाव,
  • आजरा : २ धामणे, भातवाडी,
  • पन्हाळा : ४ जोतिबा, पडळ, पोर्ले
  • भूदरगड : १ कलनाकवाडी,

मृत्यू रोखण्यात शिरोळ आघाडीवरशिरोळ तालुक्यात गेल्या महिन्याभरात मृत्यूने उच्चांक गाठला होता, पण रविवारी आलेल्या अहवालामध्ये तालुक्यात नव्याने ६५ रुग्ण आढळले तरी एकही मृत्यू झालेला नाही हे विशेष. तालुक्याने बऱ्यापैकी मृत्यूवर नियंत्रण मिळवल्याचेच यातून दिसत आहे. चंदगड, गगनबावड्यात देखील एकही मृत्यू झालेला नाही हे आणखी एक विशेष. तेथे संसर्गाचे प्रमाणही खूपच अत्यल्प आहे. चंदगडमध्ये १० तर गगनबावड्यात केवळ दोनच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मृत्यूरविवारी ३६ जणांना मृत्यू झाला. त्यातील तब्बल १० मृत्यू हे कोल्हापूर शहरातील आहेत. यात ४ सीपीआरमधील तर ६ मृत्यू हे खासगी रुग्णालयातील आहेत. संसर्गाचे प्रमाण ३२२ आले असल्याने शहरवासियांना हा दिलासा असला तरी वाढणारे मृत्यू हे धडकी भरवणारे ठरत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर