corona cases in kolhapur : महापालिका वॉररूमतर्फे दीड हजार रुग्णांना बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 PM2021-05-07T16:41:23+5:302021-05-07T16:43:44+5:30

CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूर महापालिकेच्या वॉररूममधून शहरातील व ग्रामीण भागातील दीड हजार कोरोनाबाधित नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांसह कोरोना केअर सेंटरमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेडचाही समावेश आहे. यावरूनच या वॉररूमची उपयुक्तता सिद्ध झाली.

corona cases in kolhapur: beds for one and a half thousand patients by municipal warroom | corona cases in kolhapur : महापालिका वॉररूमतर्फे दीड हजार रुग्णांना बेड

corona cases in kolhapur : महापालिका वॉररूमतर्फे दीड हजार रुग्णांना बेड

Next
ठळक मुद्देमहापालिका वॉररूमतर्फे दीड हजार रुग्णांना बेडऑक्सिजन सिलिंडरचाही पुरवठा

कोल्हापूर : महापालिकेच्या वॉररूममधून शहरातील व ग्रामीण भागातील दीड हजार कोरोनाबाधित नागरिकांना बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांसह कोरोना केअर सेंटरमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेडचाही समावेश आहे. यावरूनच या वॉररूमची उपयुक्तता सिद्ध झाली.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्‍याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे रुग्णांना बेडसाठी विविध रुग्णालयांत फिरायला लागू नये, त्यांना तत्काळ बेड मिळावेत म्हणून महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने दि. ७ एप्रिलपासून वॉररूम सुरू केली आहे. शहरातील नागरिकांना सरकारी व खासगी रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती येथे २४ तास उपलब्ध होते. ही सुविधा कोरोना रुग्णांना फायदेशीर ठरत आहे. एका फोनवर त्यांना शिल्लक बेडची माहिती मिळत आहे. यामुळे वेळेवर उपचार होत असल्याने कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी हा विभाग एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे.

कोल्हापूरसह पुणे, मुंबई, कर्नाटकवरूनही फोन येत आहेत. वॉररूममध्ये आजपर्यंत दोन हजार नागरिकांनी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड व हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी बेड उपलब्धतेसाठी संपर्क साधला आहे. यापैकी सरकारी व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये तसेच कोविड काळजी केंद्र यांच्याबद्दल बेड उपलब्धतेची माहिती दिली गेली.

ऑक्सिजन सिलिंडरचाही पुरवठा

महानगरपालिकेने जिल्हाधिकारी यांच्या मदतीने दहा साखर कारखान्यांकडून त्यांच्याकडील ८० ऑक्सिजन सिलिंडर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अधिग्रहित केली आहेत. खासगी अथवा सरकारी रुग्णालयांकडील ऑक्सिजनचा साठा कमी पडल्याची माहिती वॉररूमकडे प्राप्त होते. यावेळी तातडीने या दवाखान्यांना त्यांचा साठा येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजनची सिलिंडर दिली जातात.

वॉररूमची अशीही सामाजिक बांधीलकी

ग्रामीण भागातील एक गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला शहरात कोठेही दाखल करून घेतले जात नव्हते. ती शहरातील एका हॉस्पिटलच्या दारात सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत गेटवर दाखल होण्यासाठी थांबली होती. परंतु, तेथेही दाखल करून घेतले नाही. त्या महिलेच्या नातेवाइकांनी महापालिकेच्या वॉररूमला बेड पाहिजे असल्याचे कळविले. तातडीने महापालिकेच्या पथकाने त्या महिलेला खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिला. महिलेची प्रसूती होईपर्यंत महापालिकेचे पथक तेथून बाहेर पडले नाही. सध्या महिला कोरोनामुक्त असून, तिचे नवजात बाळही सुखरूप आहे.

वॉररूम फोन नंबर्स

  • ०२३१- २५४५४७३
  • ०२३१ - २५४२६०१.
  • या नंबरवर संपर्क केल्यास कोणत्या रुग्णालयामध्ये कोविड उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत याची माहिती दिली जाते.

Web Title: corona cases in kolhapur: beds for one and a half thousand patients by municipal warroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.