corona cases in kolhapur : ९२१ नवे रुग्ण, ५० कोरोना बळी, १०७२ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:58 AM2021-05-10T09:58:47+5:302021-05-10T10:23:59+5:30

CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नवे ९२१ रुग्ण सापडले, तर बळींचा आकडाही ५० वर आला. हाच मृत्यूचा आकडा गेल्या दोन दिवसांपेक्षा दहा ते पंधराने कमी झाला आहे. १०७२ जण कोरोनामुक्तही झाले आहेत. करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, आजऱ्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

corona cases in kolhapur: 21 new patients, 50 corona victims, 1072 corona free: Karveer, Shirol, Hatkanangle, Panhala, most sick | corona cases in kolhapur : ९२१ नवे रुग्ण, ५० कोरोना बळी, १०७२ जण कोरोनामुक्त

corona cases in kolhapur : ९२१ नवे रुग्ण, ५० कोरोना बळी, १०७२ जण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्दे९२१ नवे रुग्ण, ५० कोरोना बळी, १०७२ जण कोरोनामुक्त करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, आजऱ्यात सर्वाधिक रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार नवे ९२१ रुग्ण सापडले, तर बळींचा आकडाही ५० वर आला. हाच मृत्यूचा आकडा गेल्या दोन दिवसांपेक्षा दहा ते पंधराने कमी झाला आहे. १०७२ जण कोरोनामुक्तही झाले आहेत. करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, आजऱ्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत गेल्या चार दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्यांची व मृत्यू होणाऱ्यांची संख्या उच्चांकावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यासह स्थानिक प्रशासनानेही नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली असून, संपूर्ण तालुक्यात कर्फ्यू लावले जात आहेत. गावेच्या गावे, शहरेच्या शहरे वेशीवर बॅरिकेड्स लावून येणे-जाणेच बंद केले जात आहे. त्याचा परिणाम दिसत असून, दीड हजारावर पोहोचलेली रुग्णसंख्या आता हजाराच्या आत आल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात ५० जणांचा बळी गेला आहे. यातील सात इतर जिल्ह्यांतील, तर ४३ मृत्यू कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्याही ११ हजार २३९ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात १०७२ जण डिस्चार्ज झाले आहेत.

५० पैकी ३९ मृत्यू ६० च्या आतील

रविवारी कोल्हापुरात कोरोनाने मृत्यू झालेल्या वयोगटावर नजर टाकल्यावर २४ ते ५० या कमावत्या गटातील नागरिकांची संख्या जास्त दिसत आहे. एकूण मृत्यूपैकी ११ मृत्यू हे ६० वयावरील आहेत, तर उर्वरित तब्बल ३९ मृत्यू हे साठीच्या आतील आहेत. त्यातही ५० च्या आतील मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. कुंभोज येथील २४ वर्षीय, तर आर. के. नगर येथील ३१ वर्षीय तरुण, वेसर्डे व शनिवार पेठ येथील ३४ वर्षीय तरुणी कोरोनाला बळी पडल्या आहेत.

जिल्ह्यात या ठिकाणी झाले कोरोनाचे मृत्यू
कोल्हापूर शहर : १३ जवाहरनगर, शनिवार पेठ, रुईकर कॉलनी, राजारामपुरी, कारंडे मळा, आर. के. नगर, जरगनगर, राजेंद्रनगर, सिंधूनगर, हरिओम नगर रंकाळा, शिवाजी पार्क, गुजरी, सरनाईक वसाहत,

  • करवीर : ४

भुये, माटेनगर, निगवे दुमाला, वडणगे,

  • शिरोळ : ३

नवे दानवाड, जयसिंगपूर, कागवाड,

  • पन्हाळा : ४

अंंबपवाडी, शहापूर, कोडोली, बच्चे सावर्डे,

  • भुदरगड : ४

सिमलवाडी करीवाडी, वेसर्डे, करंबळी, गारगोटी, हणबरवाडी,

  • हातकणंगले : ४

कुंभोज, कोरोची, अंबप, रुकडी,

  • चंदगड : १ कासेगळे,
  • कागल : १ सांगाव,
  • आजरा : ३ महागाव, आजरा, खोराटवाडी,
  • गडहिंग्लज: १ मुगळी,
  • इचलकरंजी : ४ इचलकरंजी,


कोरोना अपडेट

९ मे २०२१ ची आकडेवारी

  • आजचे रुग्ण : ९२१
  • आजचे जिल्ह्यातील मृत्यू : ४३
  • इतर जिल्ह्यातील मृत्यू : ०७
  • उपचार घेत असलेले : ११ हजार २३९
  • आजचे डिस्चार्ज : १०७२
  • सर्वाधिक रुग्ण :
  • कोल्हापूर शहर : २११
  • करवीर ११९
  • शिरोळ १०४
  • हातकणंगले : ९०


कोल्हापूर शहर मृत्यू : १३ (प्रत्येकी एक)
जवाहरनगर, शनिवार पेठ, रुईकर कॉलनी, राजारामपुरी, कारंडे मळा, आर. के. नगर, जरगनगर, राजेंद्रनगर, सिंधूनगर, हरिओम नगर रंकाळा, शिवाजी पार्क, गुजरी, सरनाईक वसाहत.

तालुकानिहाय मृत्यू   रुग्ण

  • करवीर          ०४      ११९
  • हातकणंगले ०४         ९०
  • भुदरगड        ०४        १०
  • पन्हाळा       ०४         ५५
  • शिरोळ        ०३         १०४
  • आजरा          ०३          ५०
  • शाहूवाडी         ००        २४
  • गडहिंग्लज    ०१         ३७
  • चंदगड          ०१         ३९
  • राधानगरी      ००       ०९
  • कागल            ०१     २९
  • गगनबावडा     ००    ०२


नगरपालिकानिहाय रुग्ण : ५५

  • इचलकरंजी २८
  • जयसिंगपूर २५
  • पेठवडगाव ०२
  • दिवसभरातील लसीकरण : २३२८
  • पहिला डोस घेतलेले नागरिक : १८०३
  • दुसरा डोस घेतलेले नागरिक : ५२५

Web Title: corona cases in kolhapur: 21 new patients, 50 corona victims, 1072 corona free: Karveer, Shirol, Hatkanangle, Panhala, most sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.