कसबा बावडा परिसरात कोरोना जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:23+5:302020-12-05T04:55:23+5:30
कोल्हापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी कसबा बावडा परिसरात पिंजार गल्ली ते भगवा चौकदरम्यान ...

कसबा बावडा परिसरात कोरोना जनजागृती रॅली
कोल्हापूर : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी कसबा बावडा परिसरात पिंजार गल्ली ते भगवा चौकदरम्यान कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर आधारित जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीस नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
रॅलीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करावे, मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दी टाळणे या बाबींबरोबरच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा घोषणा देण्यात आल्या.