कोरे अभियांत्रिकीचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST2020-12-05T04:51:39+5:302020-12-05T04:51:39+5:30
सिस्को सेंटर ऑफ एक्सलन्स फोर नेटवर्किंग, अमेझॉन वेब सर्विसेस सेंटर ऑफ एक्लंलेन्स फोर क्लाउड कंपुटिंग,ब्ल्यू प्रिझम युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ...

कोरे अभियांत्रिकीचा आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार
सिस्को सेंटर ऑफ एक्सलन्स फोर नेटवर्किंग, अमेझॉन वेब सर्विसेस सेंटर ऑफ एक्लंलेन्स फोर क्लाउड कंपुटिंग,ब्ल्यू प्रिझम युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग मायक्रोचीप सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन ॲण्ड डेव्हलपमेंट आणि ऐजूस्किल फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून विविध कोर्सेस महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून, मायक्रोचीप सेंटर पीसीबी डिझाईनिंग प्रोग्रामिंग आणि इतर कोर्सेस उपलब्ध करून देणार आहेत. ब्ल्यू प्रिझम युनिव्हर्सिटी सिंगापूर फाउंडेशन कोर्स आणि सर्टिफाइड डेव्हलपमेंट कोर्स विद्यार्थ्यांना नोकरीसाठी महत्त्वाचे घटक ठरणार असल्याचे प्राचार्य आणेकर यांनी सांगितले.
वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी उपक्रमांचे कौतुक करून अभिनंदन केले. सामंजस्य करार होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख सी. पी. शिंदे, एन. बी. जाधव यांचे सहकार्य लाभले. या सेंटर ऑफ एक्सलन्स कोर्सचे प्रमुख समन्वयक म्हणून डॉ. संतोष भोपळे हे काम पाहत आहेत.
फोटो... तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीत सिस्को सेंटर ऑफ एक्सलन्स फोर नेटवर्किंग कोर्सचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर यांच्या हस्ते झाले. प्रा. सी. पी. शिंदे, डॉ. एस. डी. भोपळे, एन. बी. जाधव व इतर उपस्थित होते.