शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठी कर्नाटकसोबत समन्वय ठेवा, विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 12:37 IST

मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सूचना

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे अलमट्टी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूरनियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाने आंतरराज्यीय समन्वय राखावा. पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन करावे, पाण्याचा विसर्ग वाढविण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना द्यावी. धरणभिंती, कालवे संरचनांची तपासणी करून कुठे गळती असल्यास दुरुस्ती करावी अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी दिल्या.विधानभवन येथे आयोजित पुणे विभागस्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.

पुलकुंडवार म्हणाले, यावर्षी हवामान विभागाने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे आपत्काळात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. सर्व विभागांनी आपले नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवावेत. पूरप्रवण व दरडग्रस्त क्षेत्रात स्थानिक यंत्रणांनी विशेष खबरदारी घ्यावी, धोकादायक पुलांचे संरचनात्मक अंकेक्षण करावे, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव पाठवावेत, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.

पोहणाऱ्यांची यादी तयार..विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलिस विभागाच्या तयारीची माहिती दिली. सर्व जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरू शकतील अशा पोहणाऱ्या व्यक्तींची यादी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महसूल, ग्रामविकास आणि पोलिस विभागाने समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीतील महत्त्वाच्या सूचना- पशूंचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्या.- मृत पशूंच्या योग्य विल्हेवाटीची व्यवस्था करावी.-आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणारी यंत्रसामग्री, पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत ठेवा.- धोकादायक वाड्यांतील नागरिकांचे स्थलांतर करा.- नाले, नदीपात्राच्या कडेची अतिक्रमणे काढून या नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतरित करा.- महावितरणने विजेचे खांब, तारा यांची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरKarnatakकर्नाटकDamधरण