शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कदमवाडीत स्वयपाक गॅस सिलीडरचा स्फोट, दोघी बहीणी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 17:45 IST

Gas, accident, kolhapurnews घरात पाणी गरम करत असताना घरगुती गॅस गळतीमुळे सिलींडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी कदमवाडीतील विठ्ल मंदीर गल्लीत घडली. स्फोटामुळे घराची खिडकीसह दगडमातीची भींत कोसळली.

ठळक मुद्देकदमवाडीत स्वयपाक गॅस सिलीडरचा स्फोट, दोघी बहीणी जखमीस्फोटात घराची भींत कोसळली; प्रापचिक साहित्याचे नुकसान

कोल्हापूर : घरात पाणी गरम करत असताना घरगुती गॅस गळतीमुळे सिलींडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी कदमवाडीतील विठ्ल मंदीर गल्लीत घडली.

स्फोटामुळे घराची खिडकीसह दगडमातीची भींत कोसळली. प्रापचिक साह्त्यिाचे मोठे नुकसान झाले. स्फोटाचा मोठा आवाज आल्याने परिसरात खळबळ उडाली. दुर्घटनेत भाजून गंभीर जखमी झालेल्या उषा चौगुले (वय ५१) व विजया चौगुले (५५) यांना तातडीने सांगलीच्या सिव्हील रुग़्णालयात दाखल केले.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कदमवाडीतील विठ्ठल गल्लीत धनाजी पाटील यांच्या घरात चौगुले ह्या दोघी भगिणी गेल्या वर्षीपासून भाडेकरु म्हणून एकाच खोलीत राहत होत्या. बुधवारी सकाळी त्यांनी स्वयपाक गॅस वर आंघोळीसाठी पाणी तापत ठेवले. त्यावेळी घराच्या दारे, खिडक्या पूर्णपणे बंद होत्या. त्याचवेळी पाणी उकळून भांड्याबाहेर पडून पेटता गॅस विझला.

दरम्यान, च्या कालावधीत संपूर्ण खोलीत गॅस कोंडून राहील्यामुळे त्याचा स्फोट झाला. या स्फोटात शेजारीत कॉटवर झोपलेल्या दोघीही बहिणी भाजून जखमी झाल्या. स्फोटामुळे दरवाजा, खिडक्या व भिंतीचा प्रमुख भाग पूर्णपणे कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरात घबरहाट पसरली.घरमालक धनाजी पाटील व परिसरातील नागरीकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, काही वेळातच अग्नीशमक दलाचे बंब घटनास्थळी पोहल्याने त्यांनी आग अटोक्यात आणली. नागरीकांनी चौगुलेच्या नातेवाईकांना बोलवून जखमी दोघींना तातडीने सांगलीच्या सिव्हील रुग़्णालयात उपचारासाठी दाखल केले.प्रापचिक साह्त्यिाचे नुकसानबंद घरात गॅस कोंडल्यानंतर स्फोटात आगीचे लोळ खोलीभर पसरल्याने घरातील कपडयांसह प्रापचिक साहित्य खाक झाले. घरातील भांडी स्फोटामुळे विखुरलेल्या अवस्थेत होती. स्फोटामुळे सुमारे तीन फुट रुंदीच्या भींतीला मोठे भगदाड पडले.

टॅग्स :AccidentअपघातBlastस्फोटkolhapurकोल्हापूर