सोयीचा; पण कंबरडे मोडणारा

By Admin | Updated: November 8, 2014 00:25 IST2014-11-08T00:11:26+5:302014-11-08T00:25:34+5:30

वाहनांचा खुळखुळा : मनपाचे अतिक्रमणाकडे लक्ष; पण रस्त्याकडे दुर्लक्ष

Convenient; But it's about to break | सोयीचा; पण कंबरडे मोडणारा

सोयीचा; पण कंबरडे मोडणारा

कोल्हापूर : सतत वर्दळीचा व वाहनधारकांच्या सोयीचा रस्ता... शेकडोंहून अधिक खड्ड्यांतून वाहनांचा प्रवास...! त्यातच हा रस्ता दोन प्रभागांमध्ये विभागलेला आणि महापालिका प्रशासनाची त्याकडे होणारी डोळेझाक... अशा कारणांमुळे हमखास कंबरडे मोडणारा, तसेच वाहनांचा खुळखुळा करणारा म्हणून सीबीएस येथील जेम्स स्टोन (विचारे विद्यालय) समोरील रस्ता ते शाहूपुरी साईक्स एक्स्टेंशन येथील बाबूभाई परीख पुलाजवळील रस्त्याची ओळख होऊ लागली आहे.
दोन प्रभागांत विभागला रस्ता...
हा रस्ता दोन प्रभागांत विभागला आहे. जेम्स स्टोनचा हा भाग शिवाजी पार्क, तर दुसरा भाग हा शाहूपुरी-साईक्स एक्स्टेंशन या प्रभागात येतो. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सरकारी कार्यालये, विविध कंपन्या तसेच बँका, पतसंस्था, आदींची संख्या जास्त आहे. त्यामुळे राजारामपुरीकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे रोज येणाऱ्या वाहनांची व पादचाऱ्यांची
संख्या लक्षणीय आहे. नेहमी गजबजलेला हा रस्ता नवीन करावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
पॅचवर्कमध्ये माती
या रस्त्यावर खड्ड्याच्या पॅचवर्कसाठी खडी व माती टाकली जाते; पण एका पावसाने खडीबरोबर मातीही वाहून जाते. पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडतात. त्यामुळे या मार्गावर दिवसातून अनेकदा किरकोळ अपघात होत आहेत, असा तक्रारीचा सूर व्यावसायिकांमधून उमटत आहे.




मनपाचे फक्त अतिक्रमणाकडेच लक्ष
दिवस-रात्र या मार्गावर वाहनांची ये-जा असते. येथे असलेली अतिक्रमणे काढण्यात महापालिका प्रशासन तत्पर असते; पण या रस्त्याची डागडुजी अथवा तो नवीन करण्यात प्रशासन पाठीमागे राहते, अशा भावना व्यावसायिकांनी मांडल्या.

या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून, या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे.
- अरुण पाटील,
व्यावसायिक


निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने वारंवार हा प्रश्न निर्माण झाला आहे. नुसती रस्त्याची डागडुजी करण्यात अधिकारी धन्यता मानत आहेत.
- सागर पंतोजी, वाहनचालक
 

Web Title: Convenient; But it's about to break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.