करंजफेणमधील पंपामुळे लोकांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:53+5:302021-07-11T04:17:53+5:30
अणुस्करा : करंजफेण (ता. शाहूवाडी) येथे भारत पेट्रोलियम कंपनीच्या राम-लक्ष्मण पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय ...

करंजफेणमधील पंपामुळे लोकांची सोय
अणुस्करा : करंजफेण (ता. शाहूवाडी) येथे भारत पेट्रोलियम कंपनीच्या राम-लक्ष्मण पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या परिसरात बाजारभोगावपासून मलकापूरपर्यंत पेट्रोलपंपची सोय नव्हती. त्यामुळे वाहनधारकांची कुचंबणा होत होती. पंपच नसल्याने चोरून आणि धोका पत्करून अनेकजण चढ्या दराने पेट्रोल-डिझेलची विक्री करत होते. हा पंप झाल्यामुळे लोकांची सोय झाली. पेट्रोल पंपाचे मालक नामदेव पोवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक कर्णसिंह गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, ज्ञानदेव वरेकर, सरपंच पृथ्वीराज खानविलकर, माजी उपसरपंच युवराज पाटील, अरविंद नानिवडेकर, रविंद्र विचारे सरकार यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१००७२०२१-कोल-करंजफेण पंप
शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणपासून जवळच राम-लक्ष्मण पेट्रोल पंपाचे उद्घाटन आमदार विनय कोरे व गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.