बांधकामावर पाणी मारण्यावरून वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST2021-03-07T04:22:12+5:302021-03-07T04:22:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बांधकामावर पाणी मारण्याच्या कारणांवरून चौघांनी घरात घुसून दोघांना सेंट्रिंगच्या पट्ट्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. ...

Controversy over hitting water on construction | बांधकामावर पाणी मारण्यावरून वादावादी

बांधकामावर पाणी मारण्यावरून वादावादी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : बांधकामावर पाणी मारण्याच्या कारणांवरून चौघांनी घरात घुसून दोघांना सेंट्रिंगच्या पट्ट्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये प्रथमेश कुष्णात पवार (रा. कळंबा) व त्यांची बहीण सुरेखा पवार हे जखमी झाले. ही घटना कळंबा (ता. करवीर) येथे टिपुगडे गल्ली त घडली. याप्रकरणी चंद्रकात पोवार, स्वप्नील पोवार, छाया पोवार, माधुरी खोत (सर्व रा. कळंबा) यांच्यावर करवीर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.

कास्टिंग चोरीप्रकरणी टेंम्पोचालकावर गुन्हा

कोल्हापूर : विक्रमनगरमधील एका कंपनीतील सुमारे १४ हजार रुपये किमतीचे कास्टिंग तीन टेम्पोतून ऑपरेटरची नजर चुकवून चोरून नेताना पकडले, प्रकरणी टेम्पोचालक सतिश बाळकृष्ण केसरकर (रा. जिळकेवाडी, ता. राधानगरी) यांच्यावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आनंदा रामचंद्र पाले (रा. टाकाळा) यांनी पोलिसांत तक्रार दिली.

शेतातील इंजिन चोरी

कोल्हापूर : सडोली खा. (ता. करवीर) येथे तांबर नावाच्या शेतात उघड्यावर ठेवलेले सात हजार रुपये किमतीचे बंद पडलेले इंजिन अज्ञाताने चोरून नेले. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात मधुकर बापू कुंभार (रा. सडोली) यांनी करवीर पोलिसांत तक्रार दिली.

Web Title: Controversy over hitting water on construction