शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत कोल्हापुरातील जागांवरुन घमासान, कोणत्या मतदारसंघात अडले घोडे.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:53 IST

..तरच योग्य तोडगा निघू शकतो

कोल्हापूर : महाविकास आघाडीतील घटक पक्षात विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि शिरोळ या तीन मतदारसंघांवरून घमासान सुरू असल्याचे पाहायला मिळते. या तिन्ही मतदारसंघांवर काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून दावा केला जात आहे. त्यातही उत्तर व राधानगरी मतदारसंघात अदलाबदल झाली तरच योग्य तोडगा निघू शकतो.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील जागा वाटपावर प्रदेश पातळीवर तिन्ही पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतून चर्चा होत आहेत. विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहेत, त्यांच्या पक्षाला ती जागा सोडण्याचा एक कॉमन फार्म्युला स्वीकारला गेल्यामुळे काही जागांवरील गुंता आपोआपच सुटला आहे.त्यामुळे कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करवीर या चार मतदारसंघात काँग्रेसचे आमदार असल्यामुळे या जागा आपसूकच काँग्रेसकडे जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे कागल, चंदगड मतदारसंघ जाणार हेही स्पष्ट असले तरी इचलकरंजी मतदारसंघावरदेखील दावा केला आहे.शिवसेना व काँग्रेस हे पक्ष राधानगरी, कोल्हापूर उत्तर व शिरोळ अशा तिन्ही मतदारसंघात आग्रही राहिल्याने या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. कोल्हापूर उत्तर शिवसेनेला देऊन राधानगरी व शिरोळ हे मतदारसंघ काँग्रेस आपल्याकडे घेऊ शकते. असे झाले तर शाहूवाडी व कोल्हापूर उत्तर या दोन मतदारसंघावर शिवसेनेला समाधान मानावे लागणार आहे.राधानगरी मतदारसंघ काँग्रेसने प्रतिष्ठेचा विषय केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राधानगरी, भुदरगडमधून काँग्रेसवर मतांचा पाऊस पडला होता. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांना चांगल्या पद्धतीने लढत देऊ आणि ही जागा जिंकू, असा विश्वास काँग्रेसला आहे. त्यामुळेच काँग्रेसने या जागेसाठी आग्रह धरला आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्याप तरी आपलाही आग्रह कायम ठेवला आहे.

दोन दिवसांत घमासान संपणारतीन जागेवरून सुरू असलेली घमासान येत्या दोन दिवसात संपेल आणि त्यातून सर्वमान्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा मात्र तिन्ही पक्षातून व्यक्त केली जात आहे. कदाचित रविवारी उमेदवारांच्या नावांची घोषणा होऊ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी