शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

गडहिंग्लज कारखान्याचा ताबा संचालकांकडे की आयुक्तांकडे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 11:16 IST

SugerFactory Gadhingli Kolhapur- हरळी (ता.गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा ताबा संचालकांकडे की आयुक्तांकडे जाणार याचा फैसला  आज, शुक्रवारी (९) होईल.त्यासाठी शासननियुक्त कारखाना हस्तांतरण समिती दुपारी १२ वाजता पुन्हा कारखाना कार्यस्थळावर येणार आहे.त्यामुळे कारखान्याचा ताबा कोण घेणार? याकडे गडहिंग्लजसह संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे गडहिंग्लज कारखान्याचा ताबा संचालकांकडे की आयुक्तांकडे ? आज फैसला : हस्तांतरण समिती पुन्हा येणार

गडहिंग्लज : हरळी (ता.गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा ताबा संचालकांकडे की आयुक्तांकडे जाणार याचा फैसला  आज, शुक्रवारी (९) होईल.त्यासाठी शासननियुक्त कारखाना हस्तांतरण समिती दुपारी १२ वाजता पुन्हा कारखाना कार्यस्थळावर येणार आहे.त्यामुळे कारखान्याचा ताबा कोण घेणार? याकडे गडहिंग्लजसह संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे.२०१३-१४ पासून 'ब्रिस्क कंपनी'ने १० वर्षांसाठी कारखाना सहयोग तत्वावर चालवायला घेतला आहे. परंतु, मुदतीपूर्वीच कारखाना सोडण्याचा निर्णय कंपनीने  घेतल्यामुळे सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांनी १० एप्रिलपर्यंत कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे देण्याचा आदेश दिला आहे.त्यानुसार कारखान्याच्या ताबा हस्तांतरणासाठी नियुक्त समितीचे प्रमुख साखर संचालक डॉ. संजयकुमार भोसले, प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. एस. एन. जाधव, लेखा परीक्षक पी.एम. मोहोळकर व शीतल चोथे हे बुधवारी(७) कारखान्यावर आले होते.तथापि, येणी - देणी अंतिम करूनच करारानुसार कारखाना ब्रिस्क कंपनीकडून संचालक मंडळाच्या ताब्यात सुस्थितीत द्यावा, या भूमिकेवर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण आणि व्यवस्थापन ठाम राहिल्यामुळे कारखान्याची ताबापट्टी होऊ शकली नव्हती.दरम्यान,कारखान्याचा ताबा घेण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही.ऊसबील, तोडणी वाहतूक बीले, कामगार पगार व इतर देणीबाबत स्पष्टता नसल्याने आणि कंपनीचे जबाबदार पदाधिकारी व निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे कारखान्याचा ताबा घेण्यासाठी ८-१० दिवसांची मुदत मिळावी,अशी मागणीही अध्यक्ष शिंदे यांनी समितीकडे केली आहे.त्यानुसार मुदतवाढ मिळणार की साखर आयुक्त कारखान्याचा ताबा घेणार ? याकडे सीमाभागातील शेतकरी, सभासद व आजी - माजी कामगारांचे लक्ष लागले आहे.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर