राम जन्मभूमी निधी संकलन अभियानात योगदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:36+5:302021-01-13T05:01:36+5:30
निपाणी : आपल्या इतिहासात एक आदर्श राजा, आदर्श मित्र, आदर्श पती असा आदर्श या शब्दाला मापदंड घालणारा राजा ...

राम जन्मभूमी निधी संकलन अभियानात योगदान द्या
निपाणी : आपल्या इतिहासात एक आदर्श राजा, आदर्श मित्र, आदर्श पती असा आदर्श या शब्दाला मापदंड घालणारा राजा आपल्यात होऊन गेला ही, अभिमानाची बाब आहे, अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरास देशवासीयांनी आपापल्या परीने निधी द्यावा, असे आवाहन भगतरामजी छाबडा यांनी केले. निपाणी येथे अयोध्या राम जन्मभूमी निधी संकलन कार्यक्रमात ते बोलत होते.
येथील व्हीएसएम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर खासदार आण्णासाहेब जोल्ले, परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजी, हाल शुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, आरएसएसचे शिवाजी व्यास, भरत चव्हाण आदी उपस्थित होते. प्रारंभी शैलेंद्र पारीख यांनी सर्वांचे स्वागत केले.
भगतरामजी छाबडा पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या जागी असलेला ढाचा हे आपल्या गुलामगिरीचे प्रतीक होते; पण आता तिथे होणारे श्रीरामाचे मंदिर आपल्यासाठी अभिमानाचे प्रतीक असणार आहे. कार्यक्रमानंतर शहरात व्हीएसएम महाविद्यालयापासून राम मंदिर, कित्तुर राणी चन्नम्मा, चनमा सर्कल, कोठीवाले कॉर्नर, नरवीर तानाजी चौक, जुने मोटार स्टँड व पुन्हा राम मंदिर या मार्गावर रॅली काढण्यात आली. सूत्रसंचालन उदय यरणाळकर यांनी केले.