सरवडेच्या बाजारात ठेकेदाराची दादागिरी

By Admin | Updated: December 16, 2014 00:21 IST2014-12-15T20:17:24+5:302014-12-16T00:21:04+5:30

व्यापाऱ्यांतून नाराजी : कराच्या पावत्या न देण्याचा प्रकार

Contractor's Dadagiri in Sarawade's Market | सरवडेच्या बाजारात ठेकेदाराची दादागिरी

सरवडेच्या बाजारात ठेकेदाराची दादागिरी

सरवडे : येथील शुक्रवार या आठवडा बाजारासाठी या विभागातील २० ते २५ गावांतील खेड्यांतून नागरिक येतात. तर जिल्ह्यातून व्यापारासाठी व्यापारी, महिला मोठ्या प्रमाणात येतात. मात्र अलीकडे बाजाराचा ठेका घेतलेल्या युवकांकडून लहान-सहान व्यापारी यांना पावत्या न देताच अरेरावी, उद्धटपणे बोलून ठेका वसूल केला जात आहे. त्यामुळे व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे आठवड्याचा मोठा बाजार भरतो. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून बाजाराचा ठेका वर्षाकाठी सुमारे दीड लाख रुपयांचा दिला जातो. गेल्या सहा महिन्यांपूर्वी सदर ठेका हा प्रकाश वागवेकर यांना देण्यात आला आहे. या बाजारात गोरगरीब महिला मोठ्या प्रमाणात स्वत:च्या शेतातील पालेभाज्या विक्रीसाठी आणतात, तर अन्य महिलाही रोजगाराची मजुरी पडावी म्हणून भाजीपाल्यांचा वापर करत असतात.
व्यापार करणेसाठी असलेल्या जागेचा विचार करून कर आकारणी होते. मात्र ठेकेदारांकडून नियम धाब्यावर बसवून काहींना पावती तर बऱ्याच व्यापाऱ्यांना पावत्या न देता सर्रास अरेरावी व उद्धट बोलून फक्त पावतीचे पैसे घेतले जातात. पावती मागितली तर हुज्जत घालून बाजारात सर्वांचे लक्ष वेधून आपले म्हणणे रेटण्याचा प्रयत्न केला जातो. अशा लोकांकडून २० ते ३० रुपये वसूल केला जात आहे.
सरवडे येथे बाजारात सर्व काही तसेच गोरगरिबांना बाजार अशी नागरिकांची भावना, तर चार पैसे गाठीशी राहून आनंदाने बाजार केला, सेवा झाली, अशी व्यापारीवर्गाची भावना असा गेले कितीतरी वर्षे प्रघात सुरू आहे. मात्र अलीकडे त्याला गालबोट लागत आहे. आठवड्यातून एक दिवसाचा बाजार, कुठे हुज्जत घालायची, वैरत्व नको म्हणून काही परगावचे व्यापारी तक्रार करत नाहीत. सर्व नामुष्कीने बोलणे सहन करत आहेत. संबंधित ठेक्यांची चौकशी व्हावी सदरचा ठेका रद्द करा व ग्रामपंचायतीनेच व्यापाऱ्यांकडून वसुली करावी, अशी मागणी होत आहे.

बाजाराचा ठेका घेऊन सहा महिने झाले असून, या ठेकेदारासंबंधी वसुलीबाबत यापूर्वी पाच ते सहा तक्रारी आल्या आहेत. यासंबंधी ग्रामपंचायत बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ.
- जी. डी. आरडे,
ग्रामविकास अधिकारी, सरवडे

Web Title: Contractor's Dadagiri in Sarawade's Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.