‘आयजीएम’मधील सफाई कर्मचाऱ्यांचा ठेकेदाराने घेतला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:22+5:302021-07-14T04:28:22+5:30
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार देऊन ठेकेदारांनी त्यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे सफाई कर्मचारी आक्रमक ...

‘आयजीएम’मधील सफाई कर्मचाऱ्यांचा ठेकेदाराने घेतला राजीनामा
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार देऊन ठेकेदारांनी त्यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे सफाई कर्मचारी आक्रमक झाले असून, ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयजीएम रुग्णालयास कोविड-१९ म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी अरिहंत सेल्स अॅण्ड सर्व्हिस या कंपनीने रुग्णालयास सफाई कर्मचारी पुरविण्याचा ठेका घेतला होता. डिसेंबर २०२० मध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने जानेवारी २०२१ मध्ये ३६ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. त्यानंतर मार्च महिन्यात दुसरी लाट आली. त्यावेळी रुग्णालयातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे एप्रिल महिन्यात आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रायोगिक तत्त्वावर एका कंपनीला स्वच्छतेचा एक महिन्याचा ठेका दिला. त्यामुळे या ठेकेदाराने त्याच्याकडील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्याचा पगार थकविला. मे व जून महिन्यातील पगार मिळाला तरी एप्रिलचा पगार मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. त्यावर सोमवारी ठेकेदाराने त्यांना एप्रिलचा पगार देऊन त्यांचा राजीनामा घेतला.
फोटो ओळी
१२०७२०२१-आयसीएच-०६
आयजीएम रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचा राजीनामा घेतल्याने ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.