शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

... म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी मागितली कोल्हापूरच्या जनतेची जाहीर माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:32 PM

Hasan Mushrif Kolhapur : कोल्हापूरकरांना यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याने घालण्याचे वचन मी दिले होते, परंतु आणखी एक वर्ष काम पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला काळम्मावाडीचे पाणी देऊ शकणार नाही, याबद्दल कोल्हापूकरांची मी जाहीर माफी मागतो, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी मुश्रीफ कबुली दिली

ठळक मुद्देथेट पाईपलाईन रेंगाळण्यास कोरोनासह ठेकेदाराच्या चुका कारणीभूतमंत्री मुश्रीफ यांची कबुली : कोल्हापूरच्या जनतेची जाहीर माफी मागतो

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याने घालण्याचे वचन मी दिले होते, परंतु आणखी एक वर्ष काम पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला काळम्मावाडीचे पाणी देऊ शकणार नाही, याबद्दल कोल्हापूकरांची मी जाहीर माफी मागतो, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी मुश्रीफ कबुली दिली

कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली थेट पाईपलाईन योजना तांत्रिक अडचणींसह कोरोनाचा कहर, वन विभागाकडून ना हरकत मिळण्यास झालेला विलंब आणि ठेकेदाराच्या चुकांमुळे रेंगाळली असल्याची कबुली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आता मात्र ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित योजनेचा आढावा घेण्याकरिता शुक्रवारी सकाळी मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्याची माहिती दिली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, थेट पाईपलाईन योजना करण्याकरिता कोल्हापूरकरांनी दीर्घकाळ आंदोलन केले. केंद्र सरकारच्या यू.आय.डी.एस.एस.एम.टी. योजनेतून ४८८ कोटींच्या या योजनेला मंजुरी मिळाली. केंद्र सरकारने साठ टक्के, राज्य सरकारने वीस टक्के तर, महानगरपालिकेने वीस टक्के असा खर्चाचा भार उचलला आहे.

 

योजनेसाठी निधी उपलब्ध झाला. २७ डिसेंबर २०१३ रोजी योजनेला मान्यता मिळाली. परंतु वन विभागाच्या परवानगी मिळण्यास विलंब झाला. २०१९ मधील अतिवृष्टी, मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोनाचा कहर, काम करताना आलेल्या तांत्रिक अडचणी, ठेकेदारांच्या चुका अशा विविध कारणांनी हे काम रेंगाळले. त्यामुळे आणखी एक वर्ष हे काम चालणार आहे.बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता (प्रकल्प) हर्षजित घाटगे यांच्यासह आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, राजेश लाटकर, आदिल फरास, शारंगधर देशमुख, संदीप कवाळे, सचिन पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफwater scarcityपाणी टंचाईkolhapurकोल्हापूर