जिल्ह्याबाहेरून १५० पोलीस, राखीव दलाची एक तुकडी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:40+5:302021-01-13T05:05:40+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे, त्यासाठी जिल्ह्याबाहेरून पोलीस बंदोबस्त ...

जिल्ह्याबाहेरून १५० पोलीस, राखीव दलाची एक तुकडी दाखल
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे, त्यासाठी जिल्ह्याबाहेरून पोलीस बंदोबस्त कोल्हापुरात मंगळवारी रात्री दाखल झाला. त्यामध्ये १५० कर्मचारी व राज्य राखीव दलाची एका तुकडीचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी (दि. १५) मतदान, तर मतमोजणी सोमवारी (दि. १८ रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी ७,६५७ उमेदवार रिंगणात आहेत, तर १,७८० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांसह जिल्ह्याबाहेरून १५० पोलीस कर्मचारी, तसेच राज्य राखीव दलाची एक तुकडी मंगळवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाली. मतदानासह मतमोजणीच्या दिवशीही हा बंदोबस्त कायम राहणार आहे. संपूर्ण पोलीस बंदोबस्ताचे वाटप आज, बुधवारी व उद्या गुरुवारी होणार आहे.