बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:41+5:302021-06-17T04:17:41+5:30

कोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची आज गुरुवारी बांद्रा कुर्ला (मुंबई) येथे सचिव श्रीरंगम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत ...

Construction Workers Welfare Board meeting in Mumbai today | बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची आज मुंबईत बैठक

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची आज मुंबईत बैठक

कोल्हापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची आज गुरुवारी बांद्रा कुर्ला (मुंबई) येथे सचिव श्रीरंगम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. यात मेडिक्लेम योजना, जीवनदायी योजनेतील परतावा, कोविड अनुदानासह अन्य प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक विचार न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने दिला आहे.

लाल बावटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे व सरचिटणीस शिवाजी मगदूम यांनी हा इशारा देणारे निवेदनाचे पत्र कामगार सचिवांसह मुख्यमंत्री, कामगारमंत्री यांच्याकडे पाठवले आहे. आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीकडे राज्यभरातील कामगारांचे लक्ष लागले आहे. कल्याणकारी मंडळ स्थापन झाले आहे, पण त्यातील योजनांचा लाभ कामगारांना दिला जात नाही. भांड्याऐवजी रोख दहा हजारांचे अनुदान द्यावे, कोविड अनुदान वाढवून मिळावे, मेडिक्लेम योजना लागू करावी याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनदेखील आयुक्त कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याने आज होणाऱ्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढच्याच क्षणी आंदोलनला सुरुवात केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Construction Workers Welfare Board meeting in Mumbai today