बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांचे दाखले मिळावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:17+5:302021-07-11T04:18:17+5:30
सरवडे : राधानगरी तालुक्यात बांधकाम कामगार प्लंबर, सेंट्रींग, गवंडी, मजूर, खुदाई कामगार व इतर काम करणाऱ्या कामगारांना ग्रामसेवक दाखले ...

बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांचे दाखले मिळावेत
सरवडे : राधानगरी तालुक्यात बांधकाम कामगार प्लंबर, सेंट्रींग, गवंडी, मजूर, खुदाई कामगार व इतर काम करणाऱ्या कामगारांना ग्रामसेवक दाखले देत नाहीत. आम्हाला वरून परवानगी नाही असे सांगितले जाते. त्यामुळे बांधकाम कामगारांचे नवीन व नूतनीकरण रखडले आहे. त्यामुळे ग्रामसेवकांकडून लवकर दाखले मिळावे, अशी मागणी शिवनेरी बांधकाम संघटनेच्यावतीने सहाय्यक गटविकास अधिकारी शरद शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील इंजिनिअरकडे दाखल्याची मागणी केली असता तेही या दाखल्यांची चौकशी होते. इंजिनियरिंगकडून मोजक्याच कामगारांना दाखले मिळतात. त्यामुळे नवीन व नूतनीकरण रखडले आहेत. शासनाच्या माध्यमातून कामगारांना मिळणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ मिळत नाही, तरी ग्रामसेवकांचे दाखले मिळावेत, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
या वेळी संघटना अध्यक्ष प्रकाश पोवार, ज्योतीराम सुतार, संजय शिद्रूक, पांडुरंग पोवार, लहू पाटील, संभाजी फराकटे, कृष्णात बुजरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
१० सरवडे बांधकाम कामगार
फोटो
बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांचे दाखले मिळावेत या मागणीचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी शरद शिंदे यांना देताना शिवनेरी बांधकाम संघटनेचे पदाधिकारी.